Xiaomi 12 Pro 5G भारतात 27 एप्रिलला होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि इतर तपशील
Xiaomi 12 Pro 5G ची भारतातील लाँचची तारीख नुकतीच समोर आली असून, 27 एप्रिलला भारतात हा फोन येणार आहे. Xiaomi 12 Pro 5G ची भारतात किंमत 65 हजारापासून, सुरू होऊ शकते. जाणून घेऊया स्मार्टफोनचे इतर तपशील.
मुंबई : नवीन Xiaomi फ्लॅगशिपचे उद्धाटन Xiaomi 12 आणि Xiaomi 12X सोबत डिसेंबरमध्ये चीनमध्ये करण्यात आले आणि मार्चमध्ये काही जागतिक बाजारपेठांमध्ये पदार्पण करण्यात आले. चीनी कंपनीने (Chinese company) नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनची भारतात 27 एप्रिलला लाँच होणार आहे. Xiaomi 12 Pro 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC आणि 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा समाविष्ट आहे. यात 12GB पर्यंत RAM तसेच 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज (Onboard storage) देखील आहे. भारतातील Xiaomi 12 Pro 5G मागील महिन्यात डेब्यू झालेल्या OnePlus 10 Pro 5G शी स्पर्धा करेल. मंगळवारी, Xiaomi ने भारतात Xiaomi 12 Pro 5G लाँच करण्याबाबत पत्रकारांना महिती देण्यासाठी ‘सेव्ह द डेट’ टीझर (‘Save the Date’ teaser) शेअर केला. तसेच 27 एप्रिल रोजी सार्वजनिकपणे लॉंचची घोषणा करण्यासाठी Xiaomi ने देखील स्वतंत्रपणे एक ट्विट पोस्ट केले आहे.
Xiaomi 12 Pro 5G ची भारतात किंमत (अपेक्षित)
Xiaomi 12 Pro 5G भारतात लॉंचींग ऑनलाइन होईल की प्रत्यक्षात याबाबत अद्याप कुठलीही माहीती कंपनीने स्पष्ट केलेली नाही. भारतात Xiaomi 12 Pro 5G ची किंमत 65000 पासून सुरू होण्याची अफवा आहे. परंतु, अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. तथापि, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी CNY 4,699 (अंदाजे रु. 56,200) च्या सुरुवातीच्या किंमतीसह हा फोन चीनमध्ये लॉंच करण्यात आला होता. हा फोन 8GB + 128GB पर्यायामध्ये देखील येतो ज्याची किंमत CNY 4,999 (अंदाजे रु. 59,800) आणि टॉप-एंड 12GB + 256GB मॉडेल CNY 5,399 (अंदाजे रु. 64,500) आहे.
Xiaomi 12 Pro 5G तपशील
Xiaomi ने त्याच्या अधिकृत Mi.com साइटवर Xiaomi 12 Pro 5G लॉन्चसाठी एक सपोर्टेड वेबपेज तयार केले आहे. वेबपेज सूचित करते की भारतातील फोनची वैशिष्ट्ये जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मॉडेलशी जुळतील. Xiaomi 12 Pro 5G ने MIUI 13 आणि 6.73-इंच WQHD+ (1,440×3,200 pixels) Samsung E5 AMOLED डिस्प्लेसह जागतिक स्तरावर पदार्पण केले ज्यामध्ये 1,500 nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz डायनॅमिक रीफ्रेश दर आहे. फोन Snapdragon 8 Gen 1 SoC द्वारे समर्थित आहे, सोबत 12GB पर्यंत LPDDR5 RAM आहे. हे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येते जे 50-मेगापिक्सेल सोनी IMX707 प्राथमिक सेन्सर, 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट आणि अल्ट्रा-वाइड शूटर्ससह देते.
कॅमेरा सेटअप आणि चार्जींग सपोर्ट
सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Xiaomi 12 Pro 5G समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह येतो. Xiaomi 12 Pro 5G 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज ऑफर करतो. हे कनेक्टिव्हिटी पर्यायांच्या श्रेणीसह येते ज्यात 5G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, NFC आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. एक इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर देखील आहे. Xiaomi ने नवीन फ्लॅगशिप 4,600mAh बॅटरीसह सुसज्ज केली आहे जी 120W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
इतर बातम्या :