भारतीय बाजारपेठेत Xiaomi च्या 39 मिलियन स्मार्टफोनची विक्री, पाहा टॉप 5 कंपन्या
भारतीय बाजारपेठेत शाओमी कंपनीने धुमाकूळ घातला आहे. 2019 वर्षात भारतीय बाजारात शाओमी कंपनीने सर्वाधिक स्मार्टफोन विकले (Xiaomi mobile sale) आहेत.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत शाओमी (Xiaomi) कंपनीने धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात भारतीय बाजारात शाओमी कंपनीने सर्वाधिक स्मार्टफोन विकले (Xiaomi mobile sale) आहेत. भारतीय बाजारात 2019 मध्ये शाओमी Q4 च्या विक्रीत 14 टक्क्यांची वाढ झाली असून एकूण 39 मिलियन युनिटची विक्री झाली आहे. त्यामुळे हे वर्ष शाओमीसाठी फायदेशीर ठरले. विशेष म्हणजे 2019 मध्ये संपूर्ण देशभरात सर्व मोबाईल कंपन्यांनी एकूण 148 मिलियन स्मार्टफोनची विक्री (Xiaomi mobile sale) केली आहे.
ग्लोबल टेक्नॉलॉजी मार्केटचं संशोधन करणारी संस्था कॅनालीजने भारतीय बाजारपेठेचा एक रिपोर्ट गेल्या आठवड्यात जाहीर केला. या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये भारतीय बाजारात शाओमी Q4 ची सर्वाधिक मागणी आहे. चायनीज वेंडरने पूर्ण वर्षभरात एकूण 42.9 मिलियन युनिट स्मार्टफोन भारतात पाठवले. तर 2018 मध्ये एकूण 41 मिलियन युनिट पाठवले होते.
शाओमीनंतर भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी सॅमसंग (Samsung) आहे. सॅमसंगने यावर्षी 32.3 मिलियन युनिट स्मार्टफोन विकले. तर 2018 मध्ये सॅमसंगने एकूण 35.4 मिलियन युनिट विकले होते.
विवोने (Vivo) एकूण 24.7 मिलियन युनिट विकून देशात तिसरा क्रमांक मिळवला. रिअलमीच्या(Realme) स्मार्टफोनचे प्रदर्शनही चागंले आहे. यामध्ये 4.7 मिलियन युनिट विकले गेले. पाचव्या स्थानावर ओप्पो आहे. ओप्पोने (Oppo) भारतीय मार्केटमध्ये यावर्षातील 42 टक्के वृद्धी नोंदवली आहे. 2019 मध्ये ओप्पोने 16.1 मिलियन युनिट स्मार्टफोन विकले.