एकदा चार्ज करा, 5 दिवस वापरा, शाओमीचा LED लॅम्प लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या पाचव्या वर्धापनदिना निमित्ताने भारतात ‘Mi Rechargeable LED Lamp’ लाँच केला आहे.
मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या पाचव्या वर्धापनदिना निमित्ताने भारतात ‘Mi Rechargeable LED Lamp’ लाँच केला आहे. हा लॅम्प तुम्ही एकदा चार्ज केला की, पुढील पाच दिवस वापरु शकता, असा दावा कंपनीने केला आहे. 18 जुलै रोजी दुपारी 12 पासून या लॅम्पची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर (MI.com) सुरु होईल. या लॅम्पच्या किंमतीबद्दल अजून सांगितलेले नाही.
या लॅम्पचे वैशिष्ट्य पाहिले तर, व्हाईट रंगाच्या एलईडीमध्ये राऊंड बेस स्टॅंड, लाँन्ग स्लिम पोल आणि सिलेंड्रिक लॅम्प देण्यात आला आहे. शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु जैन यांनी ट्विटरवर या लॅम्पचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लॅम्पच्या काही खास फीचरची माहिती देण्यात आली आहे.
Mi fans, here’s another #MiTurns5 surprise! ?
Introducing #MiRechargeableLEDLamp!
➡️ 3 brightness levels ➡️ Up to 5 days battery life ➡️ Perfect emergency light solution ➡️ Portable & easy to carry
Crowdfunding starts, 18th July, 12pm on https://t.co/lzFXOcGyGQ! #Xiaomi ❤️ pic.twitter.com/TyPww7Kdt9
— Manu Kumar Jain (@manukumarjain) July 16, 2019
एमआय रिचार्जेबल एलईडी लॅम्पमध्ये व्हाईट, वार्म व्हाईट अशा रंगात ब्राईटनेस लेव्हल आहेत. हा लॅम्प तुम्ही एकदा चार्ज केला की, पुढील पाच दिवस तुम्ही वापरू शकता, असा दावा कंपनीने केला आहे. हा लॅम्प खूप हलका असल्यामुळे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. जिथे सतत लाईट जाते अशा लोकांसाठी हा लॅम्प उपयोगी ठरु शकतो, असं कंपनीने सांगितलेले आहे.
शाओमी आपल्या पाचव्या वर्धानपन दिनानिमित्ताने 23 जुलै पासून MI वॉटर टीडीएस टेस्टरही लाँच करत आहे. या टेस्टरच्या माध्यमातून यूजर्स पिण्याच्या पाण्याची क्वॉलिटी चेक करु शकतात. या माध्यमातून काही सेंकदात 9990 पर्यंत टीडीएसला डिटेक्ट केले जाऊ शकते. इंडियन स्टॅंडर्ड ISO10500/2012 नुसार पाण्यात 2000 टीडीएसपर्यंत प्रमाण आरोग्यास हानिकारक नसते. यापेक्षा अधिक टीडीएस पाण्यात असल्यास आपल्यासाठी ते धोकादायक ठरु शकते.
याशिवाय कंपनी वर्धापनदिन निमित्ताने भारतात एसाय बिअर्ड ट्रिमर, लहान मुलांसाठी बिल्डर टॉय आणि Mi Super Bass Wireless Headphones लाँच करत आहे. या सुपर हेडफोनची किंमत 1799 रुपये आहे. हा हेडफोन ब्लॅक-रेड आणि ब्लॅक-गोल्ड अशा दोन रंगात खरेदी करु शकता.