भारतात लाँच होणार शाओमीचा ‘ब्लॅक शार्क 2’, पाहा किंमत
नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लाँच केला आहे. लवकरच कंपनी भारतात हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा गेमिंग स्मार्टफोन आहे आणि यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत. या फोनची डिझाईन पाहता प्रत्येकाला आकर्षित करेल अशी या फोनची डिझाईन आहे. शाओमीने पहिल्यांदा सर्वात वेगळ्या आणि हटके अशा डिझाईनमध्ये […]
नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लाँच केला आहे. लवकरच कंपनी भारतात हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा गेमिंग स्मार्टफोन आहे आणि यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत.
या फोनची डिझाईन पाहता प्रत्येकाला आकर्षित करेल अशी या फोनची डिझाईन आहे. शाओमीने पहिल्यांदा सर्वात वेगळ्या आणि हटके अशा डिझाईनमध्ये हा फोन लाँच केला आहे. या फोनच्या मागच्या बाजूला एस नावाचा लोगोही दिसत आहे. त्यामुळे अंधारातही हा लोगो उठून दिसतो.
ब्लॅक शार्क 2 फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. यामध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 4000 mAh बॅटरी आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनल दिला आहे. गेमर्सच्या मदतीसाठी फोनच्या चारही बाजूने प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम दिला आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 48+12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या फोनमध्ये दोन रंगाचा पर्याय दिला आहे. फ्रोजेन सिल्व्हर आणि शॅडो ब्लॅक. फोनची किंमत चीनमध्ये 3,200 युआन आहे म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे 33 हजार रुपये. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 4,200 युआन म्हणजेच भारतीय रुपयात 43 हजार रुपये आहे.