रेडमी के 20 आणि के 20 प्रो भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर

चिनी मोबाईल कंपनी शाओमीने नवीन के सीरीजचा स्मार्टफोन के 20 आणि के 20 प्रो भारतात आज (17 जुलै) लाँच केला. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन मे महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते.

रेडमी के 20 आणि के 20 प्रो भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर
Follow us
| Updated on: Jul 17, 2019 | 4:31 PM

मुंबई : चिनी मोबाईल कंपनी शाओमीने नवीन के सीरीजचा स्मार्टफोन के 20 आणि के 20 प्रो भारतात आज (17 जुलै) लाँच केला. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन मे महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. शाओमीने भारतात के 20 स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये आणि के 20 प्रो स्मार्टफोनची किंमत 27 हजार 999 रुपये ठेवली आहे. के 20 आणि के 20 प्रो 22 जुलैपासून फ्लॅश सेलच्या माध्यमातून फ्लिपकार्ट आणि MI.com उपलब्ध होईल, अशी घोषणा शाओमीने केली आहे.

के 20 स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरिअंट दिलेले आहेत. यामध्ये एक 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेजसह 21 हजार 999 रुपये, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेजचा व्हेरिअंट 23 हजार 999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. के 20 प्रो स्मार्टफोनमध्येही दोन व्हेरिअंट दिले आहेत. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेजचा फोन 27 हजार 999 रुपये, तर 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोअरज फोन 30 हजार 999 रुपयामध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

मोबाईल खरेदीवर खास ऑफर्स

शाओमीने दोन्ही स्मार्टफोनवर खास ऑफर्स दिल्या आहेत. पहिल्या सेल दरम्यान युजर्सने हा स्मार्टफोन ICICI च्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यांना 2 हजार रुपये कॅशबॅक मिळेल. याशिवाय एअरटेल युजर्सने हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना डबल डेटा मिळणार आहे.

के 20 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

  •  6.39 इंचाचा डिस्प्ले
  • पॉप अप सेल्फी कॅमेरा (20 मेगापिक्सल)
  • ट्रिपल रिअर कॅमेरा (48MP+13MP+8MP)
  • लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर
  • 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेज
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी  स्टोअरेज
  • 27W चा फास्ट चार्जर सपोर्ट
  • 4000mAh बॅटरी क्षमता

के 20 प्रो स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्स

  • 6.39 इंचाचा डिस्प्ले
  • पॉप अप सेल्फी कॅमेरा (20 मेगापिक्सल)
  • ट्रिपल रिअर कॅमेरा (48MP+13MP+8MP)
  • लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर
  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोअरेज
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी  स्टोअरेज
  • 27W चा फास्ट चार्जर सपोर्ट
  • 4000mAh बॅटरी क्षमता
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.