स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत…

शाओमीने (Xiaomi) शुक्रवारी फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi अल्ट्रा लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात मोठ्या कॅमेरा सेन्सरसह सादर करण्यात आला आहे.

स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत...
Xiaomi Mi 11 Ultra
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 4:43 PM

मुंबई : शाओमीने (Xiaomi) शुक्रवारी फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi अल्ट्रा लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात मोठ्या कॅमेरा सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेकेंडरी डिस्प्लेदेखील आहे. क्वालकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 SoC या फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा, वनप्लस 9 प्रो आणि व्हिवो एक्स 60 प्रो + यांसारख्या अन्य Android फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना जोरदार टक्कर देणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आला होता. (Xiaomi Mi 11 Ultra, Mi 11X Series and Mi QLED TV 75 debut in India; know more)

या इव्हेंटमध्ये शाओमीने Mi 11X सिरीजही लाँच केली होती. ज्यामध्ये दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Mi 11X आणि Mi 11X प्रो अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती MI 11 अल्ट्रापेक्षा जास्त आहेत. कंपनीने यावेळी शाओमीचा सर्वात मोठा टीव्हीदेखील लाँच केला आहे. Mi QLED टीव्ही 75 4K 120Hz पॅनलसह येतो.

Mi 11 अल्ट्राची किंमत

भारतात या फोनची किंमत 69,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 12 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. कंपनीने हा फोन देशात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. शाओमीचा हा फोन महाग आहे, कारण कंपनी हा फोन चीनवरुन आयात करत आहे. चीनमध्ये या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 67,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 72,500 रुपये आहे. तर 12 जीबी आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस असलेल्या व्हेरिएंटची किंमत 78,100 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

शानदार कॅमेरा

या फोनच्या कॅमेराविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये मागील बाजूस 1.1 इंचांचा सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर कॅमेरा सिस्टिममध्ये प्रायमरी 50 मेगापिक्सलचा सॅमसंग GN2 सेंसर देण्यात आला आहे, जो OIS सह येतो. तसेच यामध्ये सेकेंडरी 48 मेगापिक्सलची सोनी IMX586 पेरीस्कोप टेलिफोटो लेंस देण्यात आली आहे, जी OIS सह येते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचं सोनी अल्ट्रा वाईड युनिट देण्यात आलं आहे. तसेच या फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 11 अल्ट्राचे फीचर्स

ड्युअल सिम 5 जी Mi 11 अल्ट्रा Android 11 वर चालतो. फोनमध्ये 6.81 इंचांचा 2k WQHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. फोनच्या मागील बाजूस सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.1 इंचाचा आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 एसओसी आहे जो 12 जीबी एलपीडीडीआर रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसह देखील येते.

इतर बातम्या

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

5000mAh बॅटरी, 6GB रॅम, किंमत खूपच कमी, ओप्पो A74 5G भारतात लाँच, शाओमी, रियलमीला टक्कर

(Xiaomi Mi 11 Ultra, Mi 11X Series and Mi QLED TV 75 debut in India; know more)

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.