Mi Turns 5 : Xiaomi सेल, मोबाईल, टीव्हीवर 12 हजारपर्यंतची सूट
स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने भारतात पाच वर्ष (Mi Turns 5) पूर्ण केली आहेत. या प्रसंगावर कंपनी अनेक स्मार्टफोन्स, एक्सेसरीज आणि Mi टीव्हीवर मोठी सूट देत आहे. हा सेल 25 जुलैपर्यंत राहाणार आहे.
मुंबई : स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने भारतात पाच वर्ष (Mi Turns 5) पूर्ण केली आहेत. या प्रसंगावर कंपनी अनेक स्मार्टफोन्स, एक्सेसरीज आणि Mi टीव्हीवर मोठी सूट देत आहे. हा सेल 25 जुलैपर्यंत राहाणार आहे. तुम्ही शाओमी इंडियाच्या वेबसाईवर या सेलचा लाभ घेऊ शकता.
शाओमीने भारतीय स्टेट बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अंतर्गत ग्राहक जर एसबीआयच्या कार्डने खरेदी करतील, तर त्यांना आणखी 5% कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर ईएमआय ट्रान्झॅक्शन्सवरही लागू आहे. त्याशिवाय, विमानाच्या तिकीट बुकिंगवर 555 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. तुम्ही एक्स्प्रेस डिलिव्हरी ऑप्शनही निवडू शकता, याअंतर्गत तुम्हाला जास्त वेळ वाट न पाहता तुम्ही खरेदी केलेली वस्तू मिळणार आहे.
Xiaomi चे बेस्ट ऑफर्स
Redmi 7S : Xiaomi चा हा स्मार्टफोन भारतात खूप प्रसिद्ध आहे. हा स्मार्टपोन काहीच दिवसांपूर्वी भारतात ताँच झाला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. Xiaomi च्या सेलदरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. एसबीआईच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास आणखी सूट मिळू शकते.
Redmi Y3 : सेल्फी सेंट्रिक हा स्मार्टफोन सेलदरम्यान तुम्ही 8,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 11,999 रुपये आहे.
Redmi 7 : Xiaomi च्या सेलदरम्यान हा स्मार्टफोन तुम्हाला 7,499 रुपयांमध्ये मिळणार आहे. याची मूळ किंमत 9,999 रुपये आहे.
Mi LED TV 4X PRO 138.8cm (55), Mi LED TV 4 PRO 138.8 cm (55) : Xiaomi च्या 55 इंचाच्या या Mi LED TV 4X PRO टीव्हीवर तब्बल 12 हजारांची सूट देण्यात आली आहे. सेलदरम्यान हा टाव्ही तुम्हाला 37,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर Mi LED TV 4 PRO 138.8 cm (55) या टीव्हीवर 10 हजारांची सूट देण्यात आली आहे. 54,999 रुपयांचा हा टीव्ही सेलदरम्यान 44,999 रुपयांमध्ये मिळणार आहे.
Mi LED TV 4A PRO, TV 4C PRO 32 इंच : Xiaomi च्या या स्मार्ट एलईडी टीव्हींवरही मोठी सूट देण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्ट टीव्हीवर 2,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. सेलदरम्यान, Mi LED TV 4A PRO 80 cm (32) आणि Mi LED TV 4C PRO 80 cm (32) हे दोन्ही टीव्ही 12,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत.
Mi LED TV 4A PRO 108cm (43) : Mi Turns 5 सेलमध्ये या LED TV ला तुम्ही केवळ 21,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 25,999 रुपये आहे.
Mi Band HRX Edition Black : Xiaomi च्या सेलदरम्यान फिटनेस बॅण्ड हे 999 रुपयांमध्ये मिळणार आहेत. एसबीआय कार्डवरील ऑफरनंतर तुम्हाला हे फिटनेस बॅण्ड 949 रुपयांमध्ये मिळेल. या बॅण्डची किंमत 1,799 रुपये आहे.
याशिवाय Xiaomi कंपनी Poco F1, Xiaomi Mi A2, Mi Speakers, Mi Pocket Speaker 2 यांवरही मोठी सूट देत आहे.