मुंबई : शाओमी (Xiaomi) कंपनी लवकरच आपला स्मार्ट टीव्ही Mi TV 6 सादर करणार आहे. कंपनी हा स्मार्ट टीव्ही 28 जून रोजी (सोमवारी) सादर करेल आणि एक उत्तम टीव्ही म्हणून त्याला पसंती मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. Mi TV 6 ड्युअल कॅमेरा सेटअपसह येणार असल्याचे या टीव्हीबाबतच्या अहवालात समोर आले आहे. अशा सेटअपसह लाँच होणारा हा पहिला टीव्ही असेल. (Xiaomi Mi Tv 6 with 48MP dual camera and 100W speaker going to launch on 28th june 2021)
नुकत्याच सादर झालेल्या टीझरनुसार, शाओमी एमआय टीव्ही 6 (Xiaomi Mi TV 6) मध्ये 48 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. हा कॅमेरा टीव्हीच्या टॉपला स्वतंत्र सेटअपमध्ये स्थापित केला जाईल. हे दोन्ही कॅमेरे ग्राहकांच्या उपयोगी पडतील, तसेच व्हिडीओ कॉल आणि जेस्चर इनेबल करण्यात मदत करतील.
यामधील सेकेंडरी कॅमेऱ्यामध्ये नवीन इंटरॅक्टिव्ह मोड मिळतील, असे म्हटले जात आहे. परंतु याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. तसेच या इंटरॅक्टिव्ह मोड्सचा लोक कसा उपयोग करतील, याबाबतही कंपनीने काही स्पष्ट केलेलं नाही. बर्याच कंपन्यांनी स्मार्ट टीव्हीमध्ये कॅमेरे दिले आहेत, परंतु टीव्हीमध्ये 48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा मिळणे हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे.
हा स्मार्ट टीव्ही 100W स्पीकरसह येईल, याबाबत दुसर्या टीझरमध्ये खुलासा करण्यात आला आहे. असे स्पीकर मिळाल्यानंतर अतिरिक्त स्पीकरची आवश्यकता भासणार नाही. तथापि, शाओमी हे स्पीकर्स टीव्हीमध्ये कशा प्रकार फिट करेल, हे अद्याप माहित नाही.
Xiaomi Mi TV 6 च्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यात वाय-फाय 6, स्पेशल ऑडिओसह 4.2.2 सराउंड साऊंड, दोन HDMI 2.1 पोर्ट, स्मूद गेमप्लेसाठी AMD फ्रीसिंक प्रीमियम गेम डिस्प्ले सर्टिफिकेशन, QLED क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी यासह बरेच काही समाविष्ट आहे. काही अपडेट्सनंतर Mi TV 6 स्मार्ट टीव्हीचं एक्सट्रीम एडिशनदेखील सादर केलं जाऊ शकतं. या टीव्हीसह कंपनी Mi TV ES 2021 smart TV लाइनअप देखील सादर करू शकते.
इतर बातम्या
WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा
भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री
64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट
(Xiaomi Mi Tv 6 with 48MP dual camera and 100W speaker going to launch on 28th june 2021)