दोन सेकंदात शाओमीचा Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro आऊट ऑफ स्टॉक

मुंबई : शाओमी कंपनीने आज भारतात Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro चा पहिला सेल आयोजित केला होता. Mi.com आणि फ्लिपकार्टवर या सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता हा सेल सुरु होणार होता. मात्र, हा सेल सुरु होताच अवघ्या दोन सेकंदात हे दोन्ही मोबाईल आऊट ऑफ स्टॉक गेले. यामुळे […]

दोन सेकंदात शाओमीचा Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro आऊट ऑफ स्टॉक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : शाओमी कंपनीने आज भारतात Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro चा पहिला सेल आयोजित केला होता. Mi.com आणि फ्लिपकार्टवर या सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता हा सेल सुरु होणार होता. मात्र, हा सेल सुरु होताच अवघ्या दोन सेकंदात हे दोन्ही मोबाईल आऊट ऑफ स्टॉक गेले. यामुळे हा मोबाईल खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro हे दोन्ही मोबाईल याच्या 48 मेगापिक्सलच्या कॅमेरा फिचरमुळे खूप लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे अनेकांना हे मोबाईल घेण्याची इच्छा होती. त्यामुळे हा सेल सुरु होण्याआधीपासूनच ग्राहक Mi.com आणि फ्लिपकार्टवर लॉग इन करुन बसले होते. मात्र, त्यांच्या मोबाईल खरेदी करण्याआधीच हे दोन्ही मोबाईल आऊट ऑफ स्टॉक गेले.

अवघ्या दोन सेकंदात हे फोन आऊट ऑफ स्टॉक गेल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. शाओमी कंपनीचे प्रमुख मनु कुमार जैन यांना ट्वीट करत अनेकांनी याबाबत तक्रारही केली. तसेच इतक्या लवकर माबाईल आऊट ऑफ स्टॉक कसा जाऊ शकतो असा सवालही विचारला. तर जाणूनबुजून असे करण्यात आल्याचा आरोपही  अनेकांनी केला.

या मोबाईलची पुढील सेल कधी असणार आहे याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या 6 मार्चला Xiaomi Redmi Note 7 या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता. हा सेल सुरु होताच काही वेळातच हा स्मार्टफोनही आउट ऑफ स्टॉक गेला होता. लोकांनी मोठ्या प्रमाणात हा स्मार्टफोन खरेदी केला होता. तेव्हा काही मिनिटांतच या स्मार्टफोनचे दोन लाखाहून अधिक स्मार्टफोन विकले गेले होते.

Redmi Note 7 स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi Note 7 मध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रिन आणि बॅक पॅनलच्या सुरक्षेसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. शिवाय सेल्फीसाठी सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Note 7 मध्ये 12+2 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर फ्रंटसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

हा स्मार्टफोन 3 जीबी आणि4 जीबी रॅम या दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 3 जीबी  रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे.

Redmi Note 7 Pro चे फीचर्स

Redmi Note 7 Pro मध्ये 6.3 इंचाचा इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम 675 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज आणि 6GB रॅम, 128GB इंटर्नल स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, एआय मोड, नाईट मोड, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग,13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 4,000mAh ची बॅटरी इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

याच्या 4 जीबी  रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 16, 999 रुपये इतकी आहे.

Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro यांच्यातील फरक काय?

दोन्ही फोनमध्ये सर्वात मोठं अंतर म्हणजे Note 7 Pro हा Note 7 च्या तुलनेत जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळेच Note 7 Pro ची किंमतही जास्त आहे. Note 7 Pro मध्ये 8 Kryo 460 कोअर, 2 ARM Cortex-A76 आणि 6 ARM Cortex-A55 कोअरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर देण्यात आलंय. स्नॅपड्रॅगन 675 सर्वात दमदार प्रोसेसर असल्याचा शाओमीचा दावा आहे.

आणखी विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर असणारा हा 20 हजार रुपये किंमतीच्या आतला पहिलाच फोन आहे. Note 7 मध्ये 2.2GHz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 660 AIE प्रोसेसर देण्यात आलंय. Note 7 हा देखील 10 हजार रुपयांच्या आतला पहिलाच फोन आहे, ज्यात 660 प्रोसेसर देण्यात आलंय.

कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. शिवाय दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Note 7 Pro हा शाओमीचा पहिला फोन आहे, ज्यात 48 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. Note 7 Pro मध्ये प्रायमरी कॅमेरा 48 आणि सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. तर Note 7 मध्ये 12+2 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर फ्रंटसाठी दोन्ही फोनमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.