‘रेडमी नोट 7’ बंद होणार, कारण…
मुंबई : शाओमी ही चीनी कंपनी रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बंद करणार असल्याचे म्हटलं जात आहे. लवकरच हा फोन बाजारातून बाहेर होईल, अशी शक्यता कंपनीच्या ट्विटर पोस्टवरुन वर्तवली जात आहे. शाओमीने रेडमी नोट 7 S हा फोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला […]
मुंबई : शाओमी ही चीनी कंपनी रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बंद करणार असल्याचे म्हटलं जात आहे. लवकरच हा फोन बाजारातून बाहेर होईल, अशी शक्यता कंपनीच्या ट्विटर पोस्टवरुन वर्तवली जात आहे. शाओमीने रेडमी नोट 7 S हा फोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लाँच केलेला रेडमी नोट 7 बंद करण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फोनची किंमत 9000 रुपये असून या फोनमध्येही 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
नुकतंच रेडमी कंपनीने रेडमी नोट 7 S लाँच केला होता. त्यानंतर रेडमी नोट 7 स्मार्टफोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत होते. त्यानुसार कंपनीने रेडमी नोट 7 या फोनची विक्री कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री कमी केल्यानंतर काही दिवसानंतर हा फोन मार्केटमध्ये विकला जाणार नाही, असं कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.
रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बाजारात लाँच झाल्यानंतर अनेकांनी त्याला पसंती दर्शवली होती. ग्राहकांची पसंती लक्षात घेता कंपनीने रेडमी नोट 7 स्मार्टफोनला रेडमी नोट 7 S या स्मार्टफोनमध्ये रिप्लेस केलं आहे.
दरम्यान रेडमी नोट 7 बंद होणार यावर कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रेडमी नोट 7 बाजारातून बाहेर होईल याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. यामुळे अनेक यूजर्स संभ्रमात आहेत. दरम्यान, रेडमी नोट 7 यूजर्सला कोणतीही अडचण होणार नाही, असंही कंपनीने म्हटलं आहे.
रेडमी नोट 7 एस फोनची किंमत कंपनीने रेडमी नोट 7 प्रो पेक्षा कमी आणि रेडमी नोट 7 पेक्षा जास्त ठेवली आहे.
रेडमी नोट 7 एसच्या 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅमसोबत 64 जीबी मेमरी असलेल्या व्हेरिअंटमध्ये 12 हजार 999 रुपये दिली आहे. रेडमी नोट 7 एसची विक्री 23 मे पासून सुरु होणार आहे.