Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत अशी टिपली छबी! या महागड्या स्मार्टफोनमध्ये कैद केले आनंदाचे क्षण

Yogi Adityanath | संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आनंदाच्या क्षणी सेल्फीचा मोह आवरता आला नाही. त्यांनी अयोध्येत सेल्फी घेतली. हा फोटो सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. योगी यांनी ज्या स्मार्टफोनमधून हा सेल्फी घेतला, तो आयफोनपेक्षा महागडा आहे.

Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत अशी टिपली छबी! या महागड्या स्मार्टफोनमध्ये कैद केले आनंदाचे क्षण
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 11:09 AM

नवी दिल्ली | 23 January 2024 : रामनगरी, अयोध्याच नाही तर संपूर्ण भारत राममय झाला होता. मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्या सजविण्यात आली होती. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सेल्फीचा मोह आवरला नाही. त्यांनी या भव्यदिव्य उत्सवात सेल्फी घेतली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांना प्रश्न पडला की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हातातील हा स्मार्टफोन कोणत्या कंपनीचा आहे? त्यांनी कोणत्या स्मार्टफोनमधून सेल्फी घेतली, ते पाहुयात..

रामलल्लासोबत टिपला आनंदाचा क्षण

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत प्रीमियम स्मार्टफोनमधून सेल्फी घेतला. त्याची एकच चर्चा सुरु झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा स्मार्टफोन iPhone 15 पेक्षा महागडा आहे. पद्मश्री भारतीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी शरयूच्या तीरावर रामलल्लाची एक आकर्षक वाळू शिल्प साकरले. त्याठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेल्फी घेतली.

हे सुद्धा वाचा

या स्मार्टफोनमधून घेतली सेल्फी

देशाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सॅमसंगच्या स्मार्टफोनमधून सेल्फी घेतली. त्यांच्या हातात सेल्फी घेताना Samsung Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन होता. हा सॅमसंगचा सर्वाधिक चर्चेतील स्मार्टफोन आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स आहेत. दक्षिण कोरियातील या कंपनीचा हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे.

Samsung Galaxy S23 Ultra: काय आहेत वैशिष्ट्ये

सॅमसंग कंपनीने नुकतीच Galaxy S24 सीरीज लाँच केली आहे. अजून या स्मार्टफोनची विक्री सुरु झालेली नाही. सध्या गॅलक्सी S23 अल्ट्राची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. हा स्मार्टफोन 6.8 इंच डायनामिक AMOLED 2X डिस्प्लेसह येतो. यामध्ये 3088 x 1440 (Quad HD+) रिझॉल्यूशन मिळेल. राऊंड कॉर्नरसह या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 झेन 2 चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

Samsung Galaxy S23 Ultra: कॅमेरा आणि किंमत

सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रामध्ये 200MP+10MP+12MP+10MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 1,24,999 रुपये आहे. तर iPhone 15 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते. तो आयफोन 15 पेक्षा अधिक महाग आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.