2 वर्षांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, 1999 रुपयांचा JioPhone कुठून खरेदी करणार?

तुम्हाला जर रिचार्जपासून सुटका हवी असेल किंवा तुम्ही नवीन फोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

2 वर्षांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, 1999 रुपयांचा JioPhone कुठून खरेदी करणार?
JioPhone
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:32 AM

मुंबई : तुम्हाला जर रिचार्जपासून सुटका हवी असेल किंवा तुम्ही नवीन फोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर देणाऱ्या कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) अशा तीन ऑफर आणल्या आहेत, ज्यात तुम्हाला एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभरासाठी कोणत्याच गोष्टींचं टेन्शन नाही. (You can buy JioPhone in 1999 rupess with 2 years unlimited calling)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जिओच्या या ऑफरची सुरुवात 1 मार्चपासून करण्यात आली आहे. यात तुम्हाला केवळ 1999 रुपयांत एक फोन आणि दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही अन्य ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. दरम्यान, हा जियोफोन कुठून खरेदी करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) त्यांचा फीचर फोन जिओ फोनचं (Jio Phone) पुढील व्हर्जन लाँच केलं आहे. नवीन जिओ फोन 2021 एका नवीन डिझाइन आणि आणि जबरदस्त ऑफरसह सादर करण्यात आला आहे. ही ऑफर तुम्ही मिस करु शकत नाही. या फोनसोबत कंपनीने तीन ऑफर सादर केल्या आहेत. जिओ स्टोरमधून तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. सोबतच इतर ऑफर्सही मिळवू शकता. Jio फोन 2021 ची ऑफर 1 मार्चपासून रिलायन्स रिटेल आणि जिओ रिटेलर्सकडे लाईव्ह झाली आहे.

केवळ 1999 रुपयांत फोन आणि अन्य फ्री सुविधा

ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांसाठी आहे. यात आपल्याला जिओ फोनसह 24 महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही अनलिमिटेड डेटा(प्रति महिना 2जीबी हाय स्पीड डेटा) चा लाभ घेऊ शकता.

1499 रुपयांत फोनसोबत एक वर्षासाठी सर्व फ्री

ही ऑफरही नवीन ग्राहकांसाठी आहे. या ऑफरमध्ये ग्राहक 1499 रुपयांत 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड सर्विसचा लाभ घेऊ शकता. यात तुम्हाला जिओ फोनसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2जीबी हाय स्पीड डेटा) मिळेल.

749 रुपयांत एक वर्षासाठी फ्री सुविधा

ही ऑफर जिओच्या जु्न्या ग्राहकांसाठी आहे. यामध्ये केवळ 749 रुपयांच्या रिचार्जवर एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हाईस कॉल, अनलिमिटेड डेटा (प्रति महिना 2 जीबी हाय स्पीड डेटा) चा लाभ घेऊ शकता. या प्लानचा लाभ आजपासून सर्व रिलायन्स रिटेल स्टोर्स आणि जिओ रिटेलर्स घेऊ शकतात. रिलायन्स या ऑफर्सची सुरुवात देशाला 2जी मुक्त करण्यासाठी केली आहे. जिओफोन वापरकर्त्यांची (युजर्स) संख्या 10 कोटी असल्याचं सांगितलं जातं. आता जिओची नजर त्या 30 कोटी युजर्सवर आहे, जे 2G फीचर फोन वापरतात. जिओच्या मते, देशात 30 कोटी 2G ग्राहक आहेत, त्यांच्या नेटवर्कची अवस्था दयनीय आहे.

संबंधित बातम्या

Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

गुगलचे फ्री स्टोरेज पर्याय बंद होणार, जाणून घ्या कसे कराल तुमचा डेटा स्टोरेज?

(You can buy JioPhone in 1999 rupess with 2 years unlimited calling)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.