फिरायला जाताना चार्जर विसरलात ? फिकर नॉट, या पॉवर बँक्सच्या मदतीने झटपट करा फोन चार्ज

पॉवर बँक चार्जरशिवाय तुमचा फोन क्षणार्धात चार्ज करू शकते. प्रवासातही तुम्ही पॉवर बँक तुमच्यासोबत बाळगू शकता.

फिरायला जाताना चार्जर विसरलात ? फिकर नॉट, या पॉवर बँक्सच्या मदतीने झटपट करा फोन चार्ज
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 11:02 AM

नवी दिल्ली : मोबाईल(mobile) हा आपल्या आयुष्याचाच नव्हे तर आपल्या शरीराचाच एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल सर्व कामे फोनद्वारे (phone) केली जातात, त्यामुळे आपला फोन पूर्णपणे चार्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेमेंट (online payment) करण्यापासून ते नकाशात मार्ग दाखवण्यापर्यंतच्या सर्व कामात मोबाईल फोन महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेकवेळा असं होतं की आपण रात्री फोन चार्ज करायला विसरतो किंवा बाहेर जाताना, फिरायला जाताना घाईघाईत आपण आपला फोनचा चार्जर (phone charger) घेऊन जायला विसरतो. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न साहजिकच पडू शकतो ? मात्र अशावेळा जास्त काळजी करण्याची गरज नाही

पॉवर बँक्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन क्षणार्धात चार्ज करू शकता. आज आपण अशा तीन पॉवर बँक्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही चार्जरशिवाय फोन अवघ्या काही वेळातच चार्ज करू शकता. मुख्य म्हणजे या पॉवर बँक्स तुम्ही कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. चला तर जाणून घेऊया माहिती…

बाजारात अनेक टॉप ब्रँड्सच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सहज चार्ज करू शकता. अशा परिस्थितीत या पॉवर बँक्स प्रवासासाठी अनुकूल आहेत. तुम्ही या पॉवर बँक्स ऑनलाइन आणि ऑफलाइन (दुकानात) दोन्ही ठिकाणीखरेदी करू शकता.

Ambrane Max 50000mAh Power Bank

जर तुम्ही ही पॉवर बँक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली तर तुम्हाला अनेक सवलतींचा लाभ मिळेल. या पॉवर बँकेची मूळ किंमत 6,999 रुपये आहे परंतु तुम्हाला 36 टक्के सूट मिळून तुम्ही ती 4,499 रुपयांना खरेदी करू शकता. 50000mAh बॅटरी क्षमता असलेल्या या पॉवर बँकमध्ये तुम्हाला 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. त्याच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा लूक एकदम क्लासी आहे आणि मेटॅलिक बॉडीमध्ये उपलब्ध आहे.

Mi 20000 mAh Power Bank, 3i

शाओमीरच्या Mi 20000mAh पॉवर बँकेची मूळ किंमत 2,199 रुपये आहे परंतु तुम्ही ती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म JioMart वरून 11 टक्के सवलतीसह केवळ 1,949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ट्रिपल आउटपुट पोर्ट असलेल्या या पॉवर बँकेची बॅटरी क्षमता 20000 mAh आहे आणि ती 18.5 mAh बॅटरी वॅट फास्टेस्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Croma 18W Fast Charge 10000mAh Power Bank

10000 mAh 18 watt फास्ट चार्जिंग सपोर्टसह या पॉवरची मूळ किंमत 2000 रुपये आहे परंतु तुम्ही क्रोमा प्लॅटफॉर्मवरून फक्त 999 रुपयांमध्ये ऑनलाइन खरेदी करू शकता. या पॉवर बँकसह, तुम्ही तुमचा फोन 5 तासात पूर्णपणे चार्ज करू शकता आणि ही पॉवर बँक बॅटरी डिस्चार्ज प्रोटेक्शनसह येते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.