मुंबई : सध्याच्या युगात प्रत्येकजण एक पेक्षा अधिक मेसेजिंग अॅपचा वापर करत आहेत (Beeper App). अशात अनेकदा वेगवेगळ्या अॅपवर मेसेज येत असल्याने ते सर्व मेसेज वाचणं शक्य होत नाही. पण, आता तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही. फक्त एका अॅपच्या मदतीने तुम्ही 15 पेक्षा जास्त चॅटिंग प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी ठेवू शकता (Beeper App).
या अॅप्लीकेशनचं नाव ‘बीपर (Beeper)’ आहे. याच्या माध्यमातून तुम्ही मेसेजिंग अॅप्सला एका ठिकाणी मॅनेज करु शकता. या अॅपच्या मदतीने तुम्ही 15 चॅटिंग प्लॅटफॉर्मला एकाच ठिकाणी मॅनेज करु शकता. हे एक सेंट्रल हबप्रमाणे काम करते आणि यामध्ये तुम्हाला फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger), सिग्नल (Signal), ट्विटर (Twitter), टेलीग्राम (Telegram), व्हॉट्सअॅप (Whatsapp) सारखे अनेक चॅट अॅप्स मिळत आहेत. याची सर्वात खास बाब म्हणजे हे अॅपल च्या iMessage ला अँड्रॉईड, लिनक्स आणि विंडोजवर उपलब्ध आहे. मेसेजिंग अॅप्सला मॅनेज करण्याशिवाय बीपरवर तुम्ही आपले चॅट आर्काइव्ह आणि स्नुजही करु शकतात.
New app alert: I’ve been working on Beeper for a while and today we’re launching! It’s a single app to chat on iMessage, WhatsApp, and 13 other networks. Been using it as my default chat client for the last 2 years and there is NO going back. Check it out https://t.co/vjAtnYvdhS pic.twitter.com/rJ39rPFixb
— Eric Migicovsky (@ericmigi) January 20, 2021
बीपर एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. ज्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला दर महिने 10 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 730 रुपये द्यावे लागतील. याच्या माध्यमातून तुम्ही सर्व अॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरु शकता.
Beeper वर तुम्ही 15 चॅटिंग सर्व्हिसचा सपोर्ट घेऊ शकता. यामध्ये अँड्रॉईड मेसेज एसएमएस (Android Messages SMS), the Beeper network, Discord, google Hangouts, Apple iMessage, Instagram, IRC, Matrix, Facebook Messenger, Signal, Skype, Slack, Telegram, Twitter आणि Whatsapp आहे. हे सर्व अॅप्स आपल्या मेसेजला एक लोकेशनवर फीड करते आणि युझर बीपरमध्ये याचे रिप्लाय देऊ शकता. त्याशिवाय, बीपरनुसार, ते दर आठवड्याला एक नवीन चॅटिंग प्लॅटफॉर्म जोडेल (Beeper App).
बीपरला ओपन सोर्स मॅट्रिक्स मेसेजिंग प्लॅटफॉर्मअंतर्गत डेव्हलप करण्यात आलं आहे आणि पहिले याला NovaChat च्या नावाने ओळखलं जात होतं. याला पेबल स्मार्टवॉचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी बनवलं आहे.
तुम्ही बीपरवर या लिंकच्या माध्यमातून साईन अप करु शकता. त्यानंतर तुम्हाला जॉईन होण्यासाठी इन्व्हिटेशन मिळेल.
Beeper App
संबंधित बातम्या :
Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट