तुमचं यूट्यूब चॅनेल होऊ शकतं बंद; करू नका ‘या’ 5 चुका
लोकांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली तर यूट्यूबवर व्ह्यूज येऊ लागतात आणि सबस्क्रायबर्स वाढू लागतात. अशावेळी एक चूक तुमची वर्षानुवर्षांची मेहनत वाया घालवू शकते, जर तुम्हीही यूट्यूबर असाल तर तुम्हाला अशा चुकांची जाणीव असायला हवी ज्यामुळे अकाऊंट लॉक होऊ शकतं.
युट्युब एक सोशल मीडियाचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. त्यात आता युट्युब हे लोकांच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. ज्यामध्ये अनेक लोक खाण्याचे, फिरण्याचे अश्या अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवून पोस्ट करतात. जेणेकरून त्यांच्या व्हिडीओला जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळतात. ज्या व्हिडीओला जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायब असेल त्यांना यूटुबकडून पैसे मिळण्यास सुरुवात होते. आपल्यापैकी असे अनेक लोकं आहेत ज्यांना नवनवीन व्हिडिओ पाहण्याची आवड असते ते युट्युबवर बराच वेळ घालवतात. यासाठी युट्युबवर व्हिडिओ बनवणाऱ्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा तुमची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाऊ शकते.
अगदी छोट्याशा चुकीमुळे युट्युब चॅनेलही बंद होऊ शकतं. जर तुम्हीही युट्यूबर असाल आणि यूट्यूबवरून पैसे कमवत असाल तर तुम्हाला अशा चुकांची जाणीव असायला हवी जी तुम्हाला अडचणीत आणू शकते.
पहिली चूक
युट्युब अकाऊंटवरून आक्षेपार्ह किंवा समाजात द्वेष पसरवण्याचे काम करणारी कोणतीही पोस्ट करू नका. पहिल्या चुकीवर युट्युब तुम्हाला नोटीस देईल, दुसऱ्या चुकीवर तुमच्या अकाऊंटवर हल्ला होईल. विशेष म्हणजे 3 चूक होताच अकाऊंट बंद करण्यात येते.
दुसरी चूक
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी कंपनीचे सर्व नियम नीट वाचा कारण जर तुम्ही यूट्यूबच्या नियमांचे उल्लंघन केले तर तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही हे नियम स्पष्टपणे सांगतात. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या अकाऊंटवर परिणाम होऊ शकतो.
तिसरी चूक
यूट्यूबवर गाणी, विनोद आणि अनेक प्रकारचे गमतीचे व्हिडिओ अपलोड केले जातात, पण युट्युबवर कोणताही अश्लील मजकूर पोस्ट करायचा नाही, हे लक्षात ठेवावे लागते. असे केल्याने तुमचे खाते अकाऊंट बंद होऊ शकते.
चौथी चूक
तुम्ही जर व्हिडिओमध्ये परवानगीशिवाय कोणत्याही चित्रपटाचं गाणे किंवा व्हिडिओ क्लिप वापरत असाल तर याचा अर्थ असा आहे की आपण कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करीत आहात. अशावेळी तुमचे चॅनेल बंद होऊ शकते.
पाचवी चूक
युट्युब चॅनेलसाठी धार्मिक भावना दुखावणारा कोणताही व्हिडिओ बनवू नका, असं केलं तरी यूट्यूब तुमचं अकाऊंट लॉक करू शकतं.