YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले 56 लाख व्हिडिओ, त्यापैकी 17 लाख आहेत भारतातले, काय आहे कारण?
YouTube वरून लाखोंच्या संख्येने व्हिडीओ कमेंट आणि चॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. या मागचे नेमके कारण जाणून घ्या.
मुंबई, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने कंपनीच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे (Community Guidelines) उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 5.6 दशलक्ष व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. यातील 1.7 दशलक्ष व्हिडिओंपैकी एक तृतीयांश व्हिडिओ एकट्या भारतात काढून टाकण्यात आले आहेत. यूट्यूबने आपल्या 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरच्या अहवालात ही माहिती दिली आहे. YouTube ने मागील तिमाहीत भारतातून अनुक्रमे 1.3 दशलक्ष आणि 1.1 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले होते.
73.7 कोटी कमेंट्सही काढून टाकण्यात आल्या
जागतिक स्तरावर, YouTube ने कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 5.6 दशलक्ष व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मशीनद्वारे कॅप्चर केलेले 36 टक्के व्हिडिओ त्वरित हटवण्यात आले आहेत. या व्हिडिओंना एकही व्हू मिळालेला नव्हता. याशिवाय, 31 टक्के व्हिडिओंवर 1 ते 10 व्ह्यूज आढळले. कंपनीने सांगितले की मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 73.7 कोटी कमेंट्सदेखील हटविल्या गेल्या आहेत.
या पाच देशांमधून काढण्यात आले सर्वाधिक व्हिडिओ आहेत
YouTube च्या आकडेवारीवरून असे दिसून येते की त्याच्या स्वयंचलित प्रणालीने 99 टक्के कमेंटवर अलर्ट जारी केला होता, त्यानंतर या कमेंट हटविल्या गेल्या आहेत. तर युजर्सच्या तक्रारीवरून 1 टक्के कमेंट्स काढून टाकण्यात आल्या आहेत. भारतासोबतच इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील आणि रशिया या देशांनीही वर्षाच्या तिसर्या तिमाहीत सर्वाधिक व्हिडिओ काढून टाकण्याच्या बाबतीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. सलग 11 तिमाहींमध्ये YouTube वरून व्हिडिओ काढून टाकलेल्या देशांच्या यादीत भारत अव्वल आहे.
50 लाख यूट्यूब चॅनेलही काढून टाकले आहेत
यूट्यूबच्या जुलै-सप्टेंबरच्या अहवालानुसार, कंपनीने जगभरातील 5 दशलक्ष यूट्यूब चॅनेल देखील काढून टाकले आहेत. यापैकी बहुतेक चॅनेल कंपनीच्या स्पॅम मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे काढले गेले आहेत. अहवालानुसार, यूट्यूबवरून हटवलेले 90 टक्क्यांहून अधिक व्हिडिओ बनावट सामग्रीमुळे काढून टाकण्यात आले आहेत.