Zomato कडून फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या तक्रार करण्याची पूर्ण प्रोसेस

झोमॅटो फूड डिलिव्हरी संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर त्यासाठी झोमॅटोवर एक स्वतंत्र व्यवस्था आहे. (zomato fraud zomato app)

Zomato कडून फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या तक्रार करण्याची पूर्ण प्रोसेस
झोमॅटो
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 3:56 PM

मुंबई : मागील काही दिवसांपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‌ॅप झोमॅटो (Zomato) हे चांगलेच चर्चेत आहे. बंगळुरु येथे झोमॅटोच्या एका कर्मचाऱ्याने फूड डिलिव्हर करताना मारहाण झाल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर या प्रकरणावर डिलिव्हरी बॉयने वेगळाच खुलासा केला. या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले. कोणी महिलेला पाठिंबा देत फूड डिलिव्हरी बॉयवर कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी महिलेकडून चुकीचे आरोप केले जात असल्याचा दावा केला. मात्र, झोमॅटो फूड डिलिव्हरी संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर त्यासाठी झोमॅटोवर एक स्वतंत्र व्यवस्था आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?, जर नसेल तर जाणून घेऊया याविषयी. (Zomato fraud complaint registration process on zomato app all details process)

इमर्जन्सी तक्रार अशा प्रकारे दाखल करा

झोमॅटो फूड डिलिव्हरी संदर्भात कोणतीही इमर्जन्सी अडचण आली असेल तर त्यासाठी तक्रार करता येईल. https://www.zomato.com/contact/emergency या लिंकवर गेल्यानंतर याविषयीची तक्रार करता येईल. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फूड डिलिव्हर करताना एखादी गंभीर घटना घडली तरीसुद्धा वरील लिंकवरुन तक्रार दाखल करता येईल.

ऑर्डसंदर्भात अडचण असेल तर चॅट सपोर्ट

फूड डिलिव्हर करण्यासंदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाली तर झोमॅटोतर्फे चॅट सपोर्टचा ऑप्शन दिलेला आहे. या विभागात डिलिव्हरी बॉयने तसेच झोमॅटोच्या कोणत्याही सेवेने गैरवर्तन केले तर चॅट सपोर्टची मदत घेता येईल. अशा प्रकारची तक्रार देताना अ‌ॅक्सिडेंट किंवा इन्सिडेंट या ऑप्शनला सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर आपला मेल आयडी, मोबाईल नंबर, नाव इत्यादी माहिती भरुन ग्राहकांना लेखी स्वरुपात मेसेज लिहता येईल. हा मेसेज टाईप करुन सेंड ऑप्शनवर क्लीक केल्यांनतर तुमची तक्रार दाखल केली जाईल.

लाईव्ह ऑर्ड़संबंधी तक्रार असेल तर

झोमॅटो अॅपवर लाईव्ह ऑर्डरची कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यासाठी ‘Support’ किंवा ‘Online ordering help’ या सेक्शनमध्ये क्लिक करावे लागेल. त्यानंतर झोमॅटोतर्फे कस्टमर केअरशी तुमचे बोलणे करुन दिले जाईल.

दरम्यान, अशा मागील काही दिवसांपासून झोमॅटो फूड डिलिव्हारी अॅप चांगलेच चर्चेत आहे. बंगळुरुसारखा प्रकार तुमच्यासोबत घडला तर, तुम्ही वर दिलेले ऑप्शन निवडून तक्रार दाखल करु शकता.

इतर बातम्या :

इंधन दरवाढीमुळे झोमॅटो वाढवणार रायडर्सचा पगार, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे दरमहा 800 रुपयांचा फटका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.