अहमदनगर महापालिका निवडणूक : कोण कुणावर भारी पडणार?

अहमदनगर : 9 डिसेंबरला होणाऱ्या अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यामुळे चर्चेत असणाऱ्या नगरमध्ये आता महापालिकेवर कोण सत्ता मिळवणार याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या पाच वर्षातील विविध घोटाळे, छिंदम प्रकरण, केडगाव हत्याकांड अशा वेगवेगळ्या प्रकरणांमुळे नगर राज्यभर गाजलं. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणता मुद्दा प्रचारासाठी वापरला जातो, […]

अहमदनगर महापालिका निवडणूक : कोण कुणावर भारी पडणार?
Follow us
| Updated on: Nov 13, 2018 | 2:41 PM

अहमदनगर : 9 डिसेंबरला होणाऱ्या अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यामुळे चर्चेत असणाऱ्या नगरमध्ये आता महापालिकेवर कोण सत्ता मिळवणार याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या पाच वर्षातील विविध घोटाळे, छिंदम प्रकरण, केडगाव हत्याकांड अशा वेगवेगळ्या प्रकरणांमुळे नगर राज्यभर गाजलं. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणता मुद्दा प्रचारासाठी वापरला जातो, त्याकडे लक्ष लागलं आहे.

अ ह म द न ग र कोणताही काना मात्रा नसलेलं शहर, तसेच राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून  ओळखला जातो. राज्यातील प्रत्येक आंदोलनाची ठिणगी नगरमधून निर्माण होते. त्यामुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्हा चर्चेत राहतो. आता चर्चा रंगलीये नगरच्या महापालिकेची. सध्या महापालिकेत शिवसेची सत्ता आहे. तर पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. आता एकहाती सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विडा उचलला आहे.

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल?

राष्ट्रवादी :-18

शिवसेना :-18

काँग्रेस :-11

भाजप :-9

मनसे :-4

अपक्ष:-9

एकूण :-68

गेल्या पाच वर्षातील गाजलेली प्रकरणं

बोल्हेगाव आणि सावेडी कचरा डेपो

40 लाखांचा पथदिवे घोटाळा

शहरातील उड्डाणपूल

कत्तलखान्यावरुन गदारोळ

भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं शिवरायांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य

केडगाव पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण

शिवसेनेची ताकद पणाला

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जय्यत तयारी केलली दिसत आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित करुन आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 68 उमेदवारांपैकी 32 उमेदवारांची यादी जारी केली. तसेच पालिकेत सत्ता असल्याने शिवसेनेत मोठा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. तर शिवसेनेने इच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेतल्याय. शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. तसेच निवडणूक म्हणजे युद्ध आहे, आणि शिवसेना नेहमीच युद्धाला तयार असते, अशा इशारा आजी आमदार अनिल राठोड यांनी दिलाय.

भाजप नगरमध्ये पहिल्यांदाच महापौर बसवणार?

अहमदनगर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आजपर्यंत सत्ता भोगली आहे. तर पालिकेची स्थापना झाल्यापासून भाजपला कधीच सत्ता मिळवता आली नाही. मात्र देशात आणि राज्यात सध्या भाजपची सत्ता असल्याने नगरच्या भाजपामध्येही आपलीच सत्ता येणार असा आत्मविश्वास निर्माण झालाय.  महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद पहिला मिळाला. ढोलताशांच्या गजरात इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींना हजेरी लावली. नगरच्या महापालिका निवडणुकीत इतर पक्ष उमेदवारांसाठी चाचपडत असताना भाजपकडून मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. लोकांमध्ये भाजपाविषयी विश्वास निर्माण झालाय. तसेच आम्ही विकासासाठी लोकांकडे मत मागणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीची अजून हालचाल नाही

शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. तसेच भाजपाला देखील आम्हीच विजयी होणार, असा विश्वास आहे. मात्र राष्ट्रवादी त्यांना कडवी टक्कर देताना दिसत नाही. सध्या राष्ट्रवादी शांत दिसत असली तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचा दावा नेत्यांकडून केला जातोय. आम्ही गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडून येऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधातेंनी व्यक्त केलाय.

प्रशासनाची जय्यत तयारी

महापालिका निवडणुकीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. तसेच सर्व मतदान केंद्र मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे कोणाची हयगय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलाय. मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क निष्पक्षपणे आणि निर्भिडपणे बजावावा असं आवाहनही करण्यात आलंय. महापालिकेच्या 17 प्रभागातील सर्व मतदान केंद्रे ही राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मॉडेल मतदान केंद्रे असतील. निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकाही करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 400 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यात उमेदवारही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 तर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 इतकी आहे. नगर पालिकेत 17 प्रभागात 68 वार्ड आहेत.

आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे महापौर झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळता, शिवसेना नेहमी शहरात वरचढ राहिलेली आहे. तर भाजपा देखील एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या ताकदीने रिंगणात उतरलीये. त्यामुळे येणारी निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये लढत पहिला मिळणार आहे. शिवाय त्यानंतर लगेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे नगरकरांसह राज्याचं लक्ष लागलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.