नगरमध्ये भाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राज्यातील धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणं समोर येत आहेत. अहमदनगरला भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या तिसर्या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्यामुळे राजकीय छेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 9 डिसेंबर रोजी महापालिकेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरु आहेत. मुलाखती सुरु असताना भाजपचे […]
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राज्यातील धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणं समोर येत आहेत. अहमदनगरला भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या तिसर्या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्यामुळे राजकीय छेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 9 डिसेंबर रोजी महापालिकेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरु आहेत.
मुलाखती सुरु असताना भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी मागितली. ज्योती अमोल गाडे यांनी प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचा निर्णया या अगोदरच घेतला होता. त्यांनी आज अधिकृतरित्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आमदार कर्डीले यांची मोठी कन्या सुवर्णा कोतकर काँग्रेसच्या माजी उपमहापौर तर सध्या नगरसेविका आहेत. सुवर्णा कोतकर यांचे नाव केडगाव दुहेरी हत्याकांडात पुढे आले असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाही.
कर्डीले यांची दुसरी कन्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप देखील सध्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. मात्र आता दुसरीकडे त्यांची तिसरी कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केल्याने पुन्हा एकदा शहरात सोयरे-धायर्यांच्या राजकारणाची चर्चा रंगत आहे.
कर्डीले यांच्या तीन मुली असून पहिली मुलगी सुवर्णा ही काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकरांची पत्नी आहे, तर दुसरी कन्या शीतल ही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी, तर तिसरी कन्या अमोल गाडे यांची पत्नी आहे. त्यामुळे या सोयरे-धायर्यांच्या राजकारणाची चर्चा सर्व राज्याला माहित आहे.
अहमदनगर महापालिकेसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 10 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
संबंधित बातम्या :