पुण्याचं नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : शहरांची नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर आता विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे. राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि […]

पुण्याचं नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी
Follow us
| Updated on: Nov 12, 2018 | 9:56 AM

पुणे : शहरांची नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर आता विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे.

राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा असल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून पुणे शहर वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व खजिना खाली करून आपल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं. म्हणून पुण्याचं नाव ‘जिजापूर’ केलेच पाहिजे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छत्रपतींचा’ आर्शिवाद घेतलेला आहे, तेव्हा आर्शिवादाला जागावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली.

उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याचा सपाटा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. नुकतंच फैजाबाद शहराचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

उत्तर प्रदेशातील या नामकरणाच्या मालिकेनंतर ही हवा आता महाराष्ट्रात पोहोचली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. औरंगाबादचं संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करावं, यासाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे.

औरंगाबाद महापालिकेत 1988 ला शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तेव्हा या शहराचं नाव संभाजीनगर करत असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती. तेव्हापासून सर्व शिवसेनेचे नेते औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. मात्र अधिकृतपणे हे नाव अद्याप बदलू शकलेलं नाही. प्रत्येक महापालिका निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा असतो.

1995 ला युतीचं राज्यात सरकार आल्यानंतर खैरे पालकमंत्री होते, तर विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष आणि तत्कालीन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणाचा प्रस्ताव मांडला. याला सर्व मंत्र्यांनी मंजुरी दिली.

पण मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. शिवसेनेनेही कोर्टात बाजू मांडली आणि कोर्टाने मंत्रिमंडळाचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. ही याचिका सुप्रीम कोर्टात अनेक वर्ष प्रलंबित राहिली आणि नंतर ती फेटाळण्यात आली.

वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.