दारु तस्करांचा हैदोस, PSI ला गाडी रिव्हर्स घेऊन चिरडलं
निलेश डाहाट , TV9 मराठी , चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारुबंदी आहे. या दारुबंदीच्या निर्णयानंतर अनेक भागात अवैधदारु पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. चंद्रपूर पोलीस दल दारू तस्करी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे. विविध मार्गाने या जिल्ह्यात दारु आणली जात आहे. […]
निलेश डाहाट , TV9 मराठी , चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारुबंदी आहे. या दारुबंदीच्या निर्णयानंतर अनेक भागात अवैधदारु पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. चंद्रपूर पोलीस दल दारू तस्करी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे.
विविध मार्गाने या जिल्ह्यात दारु आणली जात आहे. दारु तस्करांची हिंमत वाढल्याने पोलीस अधिकाऱ्यांना चिरडण्यापर्यंत मजल गेली आहे. नागभीड तालुका स्थानी असलेल्या ठाण्यातील प्रभारी पोलिस अधिकारी छत्रपतीची चीडे मौशी वळणाजवळ सकाळी 8 च्या सुमारास अवैध दारु संदर्भातील गस्ती मोहिमेवर होते. वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार तैनात असताना त्यांनी संशयित वाहन अडवले.
या वाहनाने इशारा समजून न घेता समोर असलेल्या एका ट्रॅक्टरला धडक दिली. वाहन थांबवण्यासाठी ते स्कॉर्पिओच्या मागे उभे राहिले. तस्कराने गाडी रिव्हर्स घेत छत्रपती चिडे यांना जागीच चिरडले. या घटनेनंतर स्कॉर्पिओ वाहन घेऊन आरोपी पसार झाले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साहिल शहजाद नावाचा तस्कर या घटनेत प्रमुख आरोपी आहे.
जखमी अवस्थेतील चिडे यांना तातडीने ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चिडे अत्यंत कठोर अधिकारी होते. त्यांना उत्तम कामगिरीसाठी उत्कृष्ट अधिकारी सन्मान मिळाला होता. जिल्ह्यात अवैध दारु तस्करांची हिंमत वाढल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असून हा अवैध दारू तस्करांच्या दादागिरीचा कळस झाला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी नागभीड येथे रवाना झाले असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.