मराठा मोर्चाचा पक्ष स्थापन, नाव ठेवलं…!
सातारा: मराठा आरक्षणासाठी विशाल मोर्चे काढल्यानंतर, मराठा समाजाने पक्षाची स्थापना केली आहे. मराठा संघटनांचा विरोध डावलून पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असं पक्षाचं नाव ठेवण्यात आलं आहे. सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा सुरेशदादा पाटील यांनी केला. पक्षस्थापनेनंतर हजारोच्या संख्येने मराठा […]
सातारा: मराठा आरक्षणासाठी विशाल मोर्चे काढल्यानंतर, मराठा समाजाने पक्षाची स्थापना केली आहे. मराठा संघटनांचा विरोध डावलून पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असं पक्षाचं नाव ठेवण्यात आलं आहे. सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा सुरेशदादा पाटील यांनी केला. पक्षस्थापनेनंतर हजारोच्या संख्येने मराठा बांधव रायरेश्वर गडावर दाखल झाले.
मराठा समाजाच्या हक्कासाठी पक्ष असावा अशी भावना गेल्या अनेक दिवासांपासून व्यक्त होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बैठक झाली होती. तिथे मराठा समाजाचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाकडून मागणी होत आहे. पण शासन स्थरावर याबाबत निर्णय होत नसल्याचा आरोप होत आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, अशी भूमिका सरकारची आहे.