मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार!

मुंबई : परप्रांतियांच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीय मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.   मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी […]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार!
Follow us
| Updated on: Nov 12, 2018 | 10:38 AM

मुंबई : परप्रांतियांच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीय मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.

परप्रांतातून मुंबईत येणारे लोंढे असो किंवा फेरीवाल्यांचा प्रश्न असो, मनसेने याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उत्तर भारतीयांवर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधलेला आहे. उत्तर भारतीयांची मतं हा मुंबईत नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळेच आता निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.