अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. तो प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो. 'पुष्पा: द राईज' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र 'पुष्पा 2'मुळे तो वादात अडकला आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.