आंबेडकर जयंती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांची जयंती 14 एप्रिल रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. बाबासाहेबांनी अस्पृशांना त्यांचे हक्क देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी सामाजिक आणि राजकीय निर्णय घेतल्याने आज आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व या तीन महत्वाच्या मुल्यांचा देशाची घटना लिहीताना विचार केला. हजारो वर्षांपासून अज्ञान आणि अंधारात आयुष्य जगणाऱ्या पददलितांना मानसिक आणि आर्थिक गुलामगिरी मुक्त केले. बाबासाहेब हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब कुशल अर्थतज्ज्ञ होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवनही केलं होतं.