महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बातम्या
देशातील एक सर्वात महत्त्वाची विधानसभा म्हणून महाराष्ट्र विधानसभेकडे पाहिलं जातं. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र विधानसभा गाजवली. महाराष्ट्र विधानसभेतून निघालेल्या अनेक दिग्गजांनी पुढे राष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे. विद्यमान महाराष्ट्र विधानसभा ही 288 सदस्यांची आहे. त्यातील 29 सदस्य हे अनुसूचित जाती आणि 25 सदस्य अनुसूचित जमातीतील आहे. महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 सदस्यांची आवश्यकता असते. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन मुंबईत होतं. तर हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतलं जातं. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे नागपूरला अधिवेशन घेऊन विदर्भातील बॅकलॉग भरून काढण्यावर भर दिला जातो. गेल्यावेळी राज्यात 2019मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षात राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार आलं होतं.