आतिशी मार्लेना

आतिशी मार्लेना

आतिशी मार्लेना यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली आहेत. आतिशी यांचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्लीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव तृप्ती वाही आणि वडिलांचं नाव विजय कुमार सिंग आहे. आतिशी यांचे वडील दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक होते. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील आहेत. आतिशी यांचं शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेतून झालं. त्यानंतर त्यांनी स्टिफेन्स कॉलेजातून पदवी घेतली. डीयूमधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी रोड्स स्कॉलरशीप मिळवून लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर्स केलं. अनेक एनजीओंसोबत त्यांनी काम केलं. आतिशी यांनी 2012मध्ये राजकारणात पाऊल टाकलं. अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्या सामील झाल्या. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्या आहेत. 2019च्या निवडणुकीत दिल्ली पूर्वमधून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आतिशी यांना 2020मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. या मतदारसंघातून त्या विजयी झाल्या.

Read More
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.