काँग्रेस
भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.