ईद उल-फितर
ईद उल-फितर इस्लाममधील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. महिनाभर रोजे ठेवल्यानंतर मोठ्या उत्साहाने ईद साजरी केली जाते. 'मीठी ईद' म्हणूनही हा उत्सव साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार हे पर्व दरवर्षी 10 व्या शव्वालच्या पहिल्या दिवशीच साजरे केले जाते. यंदा 11 एप्रिल 2024 रोजी ईद साजरी केली जाणार आहे. ईद साजरी करण्याची वास्तविक तारीख चंद्राच्या दर्शनावर आधारित असते. चंद्राचं दर्शन इस्लामिक कॅलेंडरच्या नुसार होते. तसेच चंद्राच्या वास्तविक दर्शनाची प्रतिक्षा केली जाते. जर 29 वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्राचं दर्शन झालं तर 10 एप्रिलला ईद साजरी केली जाईल, असं सांगितलं जातं. पण जर 30 वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसला तर 11 एप्रिल रोजी ईद साजरी केली जाईल.