
ग्लोबल समिट 2024
देशाच्या नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटचे आयोजन जर्मनीमध्ये होत आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक स्टुटगार्ट स्टेडियममध्ये 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान ग्लोबल समिट पार पडणार आहे. News9 ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. या समिटमध्ये पोर्शे, मारुती, सुजुकी, मर्सिडीज बेंज, भारत फोर्स यांच्यासह भारत आणि जर्मनीच्या अनेक व्यापार प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी, इंडो जर्मन चॅम्बर ऑफ कॉमर्स आणि एसोचॅम सारख्या व्यापार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 10 सत्रांमध्ये 50 पेक्षा जास्त वक्ते या समिटमध्ये भाग घेतील.
इंडो-जर्मन पार्टनरशीपवर पंतप्रधान मोदी यांचं ऐतिहासिक भाषण; भारताला विकासाच्या शिखरावर नेण्याचं आवाहन
जर्मनी भारताचा एक विश्वासू भागिदार आहे. सध्या जर्मनीच्या भारतात 1800 हून अधिक कंपन्या सक्रिय आहेत. जवळपास तीन लाख भारतीय जर्मनीत राहतात. आणि 50 हजार विद्यार्थी जर्मनीच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Nov 22, 2024
- 11:16 pm
News9 ग्लोबल समिट: भारताचा एकमेव मीडिया समूह जो देशाला जर्मनीसोबत जोडतोय, याचा मला आनंद : पंतप्रधान मोदी
TV9 च्या जर्मनीतील ग्लोबल समिट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आणि भारत-जर्मनी संबंधांवर भाष्य केलं. मोदींनी जर्मन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारताच्या प्रगतीत सहभागी होण्याचा हा योग्य वेळ असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
- Chetan Patil
- Updated on: Nov 22, 2024
- 10:35 pm
इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशनवर भारताचा जोर, जर्मन कंपन्यांना पंतप्रधान मोदींचं आवाहन काय?
News9 Global Summit च्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जर्मनीच्या संबंधावर भाष्य केलं. भारत आणि जर्मनीचं नातं अनेक शतकापासूनचं आहे. तमिळ आणि तेलगू पुस्तके छापणारा जर्मनी हा यूरोपातील पहिला देश आहे. भारतातील 50 हजार विद्यार्थी आज जर्मनीत शिक्षण घेत आहे, असं सांगतानाच आज जगातील सर्व देश भारतासोबत भागिदारी करण्यासाठी उत्सुक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Nov 22, 2024
- 9:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाला RRR चा मंत्र; टीव्ही9 नेटवर्कचे MD-CEO बरुण दास यांचं प्रतिपादन
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. मोदींनी न्यूज9 ग्लोबल समिटचं आमंत्रण स्वीकारून संबोधित केल्याबद्दल बरूण दास यांनी मोदींचे आभार मानले. मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. आज त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा शांतता आणि प्रगतिचं व्हिजन मिळेल असंही ते म्हणाले.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Nov 22, 2024
- 9:36 pm
भारत आणि जर्मनी जगाचं भवितव्य ठरवतील; TV9 चे MD-CEO बरुण दास यांचा विश्वास
न्यूज9 ग्लोबल समिटचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक महत्त्वाचे परिसंवाद होणार आहेत. यावेळी भारत आणि जर्मन यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यावर जोर देण्यात येत आहे. यावेळी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीओओ बरुण दास यांनी दोन्ही देशांच्या संबंधाचे विविध पैलू उलगडून दाखवले. तसेच बाडेन-वुर्टेमबर्गचा महाराष्ट्राशी कसा संबंध आहे, हे नातं कसं शाश्वत आहे, हेही अधोरेखित केलं.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Nov 22, 2024
- 8:56 pm
News9 Global Summit : भारत ते जर्मनी, AI च्या माध्यमातून शेतात प्रगती होणार, जर्मनीच्या कृषी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यूज9 ग्लोबल शिखर संमेलनात जर्मनीचे अन्न आणि कृषी मंत्री सेम ओझदेमिर यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत-जर्मनी सहकार्याला चालना देण्यासाठी AI, नाविन्यपूर्ण ऊर्जा आणि मुक्त व्यापार कराराची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. कुशल कामगारांच्या आदानप्रदानावरही त्यांनी भर दिला.
- Chetan Patil
- Updated on: Nov 22, 2024
- 5:13 pm
News9 Global Summit: शाहरुख खान आणि भारतीय चित्रपटांबद्दल काय विचार करतात जर्मन? ग्लोबल समिटमध्ये सांगितले…
News9 Global Summit Germany: देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटमध्ये भारतीय चित्रपटांवर चर्चा झाली. यावेळी ऑलिव्हर मॅनने शाहरुख खानचा उल्लेख केला. तसेच या 'स्लमडॉग मिलेनियर'चे उत्कृष्ट चित्रपट म्हणून वर्णन केले.
- Jitendra Zavar
- Updated on: Nov 22, 2024
- 4:40 pm
जर्मनीमध्ये न्यूज9 ग्लोबल समिट ही ऐतिहासिक सुरुवात : ज्योतिरादित्य सिंधिया
एखाद्या मीडिया संस्थेने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कोणत्याही भारतीय सोडा, जगातील मीडिया संस्थेकडूनही अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. Tv9 नेटवर्कने ऐतिहासिक सुरुवात केली आहे, असे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
- Namrata Patil
- Updated on: Nov 22, 2024
- 10:16 am
News9 Global Summit : भारत-जर्मनी तर पक्के मित्र…News9 ग्लोबल महासमिटमध्ये जर्मनीच्या मंत्र्यांनी कौतुकाचा बांधला पुल
News9 Global Summit Germany : News9 ग्लोबल महासमिट सध्या जर्मनीत सुरू आहे. Tv9 नेटवर्क चे MD आणि CEO बरुण दास यांनी हे समिट दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर जर्मनीचे मंत्री फ्लोरियन हॅसलर यांनी दोन्ही देशांची मैत्री पक्की असल्याचा दावा केला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 22, 2024
- 9:22 am
India-Germany : ग्लोबल समिटमध्ये VfB Stuttgart चे CMO भारत-जर्मनी संबंधांबद्दल काय बोलले?
India-Germany : टीवी9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटला सुरुवात झाली आहे. जर्मनीच्या स्टटगार्ट शहरातील ऐतिहासिक फुटबॉल मैदान MHP एरिनामध्ये ही समिट होत आहे. या समिटला उपस्थित राहण्यासाठी भारतासह जगातील नामवंत व्यक्ती तिथे पोहोचल्या आहेत. या प्रसंगी India-Germany: Business & Beyond वर वीएफबी स्टटगार्टचे चीफ मार्केटिंग एंड सेल्स ऑफिसर रूवेन कॅस्पर यांनी आपले विचार मांडले.
- Dinananth Parab
- Updated on: Nov 22, 2024
- 9:21 am
News9 Global Summit : वडिलांच्या काळात परिस्थिती कठीण, आजचा भारत बदललाय – रामू राव जुपल्ली
देशातील नंबर -1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटच्या जर्मन आवृत्तीसाठी महामंच सज्ज झाला आहे. या समिटच्या पहिल्या दिवशी माय होम ग्रुपचे व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी एंटरप्रेनरशिपवरआपले विचार मांडले. आजचा भारत बदलला असून नव्या उत्साहाने, उर्जेने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं.
- manasi mande
- Updated on: Nov 22, 2024
- 2:34 pm
News9 Global Summit : तंत्रज्ञानाने चित्र बदललं, अवघ्या 5 तासात आला निकाल : अश्विनी वैष्णव
वैष्णव यांनी आपल्या भाषणात कोविडसारख्या महामारी दरम्यान जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख केला. त्या काळात जेव्हा जगातील अनेक मोठ्या देशांनी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी खर्चावर लक्ष केंद्रित केले, भारताने त्या काळात गुंतवणुकीचा मार्ग निवडला.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Nov 21, 2024
- 11:42 pm
News9 ग्लोबल समिट हा भारत-जर्मनी संबंधांमधील मैलाचा दगड, धन्यवाद जर्मनी : MD & CEO बरुण दास
टागोरांचं जर्मनीशी नातं होतंच. पण भारतातील सर्वात जुनी भाषा संस्कृत आणि जर्मनच्या दरम्यानचं लँग्वेज बाँड पाहूनही मी आश्चर्यचकीत झालो आहे. संस्कृतमध्ये मास्टर्स करणारे हेनरिक रोथ हे पहिले जर्मन व्यक्ती होते.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Nov 21, 2024
- 10:29 pm
जर्मनीत News9 ग्लोबल महासमिटचा श्रीगणेशा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाकडे देशाचं लक्ष
News9 Global summit in Germany : देशातील पहिल्या क्रमांकाचे न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटचा श्रीगणेशा अगदी थोड्याच वेळात सुरू होत आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक स्टर्टगार्ट स्टेडियमवर दिग्गजांचा कुंभमेळा भरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जागतिक मंचावरून देशाला आणि विश्वाला काय संदेश देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 21, 2024
- 10:44 pm
News9 ग्लोबल समिटसाठी जर्मनी सज्ज, आजपासून होणार सुरूवात, पंतप्रधान मोदीही होणार सहभाागी
देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला आजपासून सुरूवात होणार आहे. जर्मनीतील स्टर्टगार्ड शहरातील ऐतिहासिक MHP एरिना या फुटबॉल मैदानात 21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत ही समिट पार पडणार आहे. या समिटमध्ये भारत आणि जर्मनीच्या स्थायी विकासाच्या रोडमॅपवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटचे मुख्य आकर्षण असणार आहेत.भारत आणि जर्मनीचे संबंध दृढ करण्यासाठी ही समिट अत्यंत महत्त्वाची आहे.
- manasi mande
- Updated on: Nov 21, 2024
- 10:44 am