इंडियन टुरिझम
भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. जंगल, नद्या, सरोवर आणि समुद्राने वेढलेला हा देश आहे. म्हणूनच पर्यटकांना भारत खुणावत असतो. त्यामुळेच भारतात पर्यटन हा सर्वात मोठा सेवा उद्योग झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनीही देशातील तसेच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाची धोरणं राबवली आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची खास वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे बारा महिने ही पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजलेली असतात. देशात कोणत्या राज्यात कुठे कुठे पर्यटन स्थळे आहेत, याचीच माहिती आम्ही देत आहोत.