आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2024
जगभरात योगा डे साजरा केला जातो. योगा दिनाचं महत्त्व आणि फायदे लोकांना कळावेत म्हणून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जगभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात तर राजकीय नेते, अभिनेते आणि सामान्य नागरिकही योगा डे उत्साहात साजरा करतात.