मराठी भाषा दिवस
दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे मातृभाषेचा गौरव व्हावा म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी मातृभाषा गौरव दिन साजरा केला जातो.
Thane MNS News : मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही, मनसे आक्रमक
Thane Municipal Corporation News : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असतानाच आता एमए-मराठी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचा जीआर ठाणे पालिकेने काढला आहे. त्यामुळे आज मनसेने आक्रमक पवित्रा घेत पालिका आयुक्तांना धारेवर धरलं.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Feb 27, 2025
- 2:12 pm
माय मराठीचा टेंभा मिरवू कसा? अभिजात भाषाप्रेमींचा ठाणे महापालिकेने आर्थिक नाड्याच आवळल्या, अजब फतव्याने गहजब माजला
Thane Municipal Corporation Circular Dispute : केंद्र सरकारकडून एकीकडे मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा दिला गेला तर दुसरीकडे राज्यातच माय मराठीला सापत्न वागणूक देण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या परिपत्रकामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Feb 27, 2025
- 12:10 pm