रेल्वे बजेट 2024
भारतात पूर्वी रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडला जायचा. 1924 पासून रेल्वे बजट सादर करण्याची परंपरा सुरू झाली. 2017मध्ये स्वतंत्रपणे शेवटचा रेल्वे बजेट मांडला गेला. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट मांडायला सुरुवात केली. पूर्वी रेल्वे मंत्री हा बजेट मांडायचे. आता केंद्रीय अर्थमंत्रीच संपूर्ण बजेट मांडतात. रेल्वे बजेटमधून रेल्वेचा जमाखर्च मांडतानाच रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जातो. रेल्वेच्या सरकारी करणापासून ते खासगीकरणापर्यंतच्या अनेक गोष्टींचे संकेत आणि निर्णय या बजेटमधून दिले जातात. रेल्वेचं पुनर्निर्माण करण्यावरही या बजेटमध्ये भर असतो.