राम मंदिर
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या परिसरात काही चमत्कारीक घटना पाहिल्या. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने या ठिकाणी रामाचं मंदिर (Ram Mandir) बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. नंतर ही मशीदही पाडल्या गेली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. अखेर कोर्टाने वादग्रस्त जागेवर राम मंदिरच असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचं काम सुरू होऊन पूर्ण झालं आहे.