प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

आपला देश 15 ऑगस्ट 1947मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर देशाला संविधानाची आवश्यकता होती. त्यामुळे संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधानाच्या निर्मितीचं काम सुरू झालं. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून देशाचं संविधान लिहिलं. त्यामुळे त्यांना संविधानाचे शिल्पकारही म्हणतात. भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपुर्द केलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशाने संविधान स्वीकारलं. 26 जानेवारीपासूनच देशात संविधान लागू झालं. त्यानुसार भारताला लोकसत्ताक आणि सार्वभौम देश म्हणून घोषित झाला. आपलं संविधान देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याचा अधिकार देतं. 26 जानेवारी 1950 (Republic Day India) रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण करून भारताला संपूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. हा देशाच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी 26 जानेवारी रोजी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टीही दिली जाते. 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड असते. त्या दिवशी पंतप्रधान देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करतात. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात.

Read More
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.