समाजवादी पार्टी
उत्तर प्रदेश हा समाजवादी पार्टीचा गड मानला जातो. गेल्या तीन दशकपासून समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात आपलं स्थान मजबूत ठेवलं आहे. जनता दलापासून वेगळं झाल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी समाजवादी पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 1989 मध्ये मुलायम सिंह यादव पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी ते जनता परिवाराचा एक भाग होते. 1992मध्ये समाजवादी पार्टीची स्थापना झाल्यावर 1993 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2003मध्ये ते मुख्यमंत्री बनले. तर 2012 मध्ये त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव मुख्यमंत्री बनले.