टॉपर्स कॉर्नर
IIT, NEET, CA आदी परीक्षेत ज्यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे किंवा अत्यंत हालअपेष्टातून ज्यांनी या परीक्षा क्रॅक केल्या आहेत, अशा लोकांची कहाणी सांगण्यासाठी हे पेज क्रिएट करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांकडून IIT, NEET, CA आदी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलिक मार्गदर्शन मिळावं, परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे? कोणती पुस्तकं वाचली पाहिजे? क्लास लावावा की लावू नये? किती तास अभ्यास केला पाहिजे? सोशल मीडियात असावं की असू नये? भाषेवर प्रभूत्त्व कसं मिळवावं? कठीण वाटणारे विषय सोपे कसे करावे? आदी विषयांचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हा टॉपर्स कॉर्नर तयार करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी यश कसं मिळवलं? त्यांनी यशाचं रहस्य कसं शोधलं? हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? इथे तुम्हाला त्यांच्या शिफारस केलेल्या पुस्तकांची, ऑनलाइन टूल्स आणि पुनरावलोकन तंत्रांची देखील माहिती मिळेल. या पेजवर टॉपर्सची सखोल प्रोफाइल, रँक माहिती आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहता येईल. हा प्लॅटफॉर्म फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालक आणि शिक्षक देखील हा मजकूर वाचून विद्यार्थ्यांसाठी योग्य वातावरण तयार करण्याची कला शिकू शकतात.