व्रत
व्रत हे धर्माचे साधन मानले जाते. जगातील सर्व धर्मांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्रतचा स्वीकार केला आहे. व्रताचे पालन केल्याने पापांचा नाश होतो, पुण्य प्राप्ती होते, शरीर आणि मन शुद्ध होते, इच्छित फलप्राप्ती आणि शांती, सिद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.