वाल्मिक कराड
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. तरीही अद्याप एक आरोपी फरार आहे. या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराडवरही मोक्का लावण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलिसांकडून सुरु आहे.