हवामान
समान्यपणे रोजच्या तापमानाला हवामान असं म्हटलं जातं. वातावरणातील बदल हा सुद्धा हवामानाचा एक भाग आहे. भारतात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे चार ऋतू आहेत. रोजचं वातावरण कसं असेल? यंदाचा पावसाळा कसा असेल? वादळ येणार की नाही? आलं तर कुठपर्यंत येईल? वातावरणातील बदल काय असणार? याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. त्यानुसार शेतकरी आपली तयारी करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हवामान खात्याकडून हवामानाबाबतचा वेळोवेळी इशारा दिला जातो.