Year Ender 2024
2024 संपून (Year Ender 2024) आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. सरत्या वर्षात जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. निवडणुका, युद्ध, भूकंप, अतिवृष्टी, महापूर या आणि अशा असंख्य घटनांनी सरतं वर्ष भरून गेलं होतं. भारतातही अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या आहेत. देशात अनेक राज्यात निवडणुका झाल्या. अनेक ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळालं. तर विधानसभा निवडणुकीतून सूर गवसण्याचा काँग्रेसचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशात मोदींच्या नेतृत्वात सरकार आलं. तर महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार आलं. तिकडे अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्याांदा सत्तेत आले. याशिवाय देशातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचं 2024मध्ये निधन झालं. याशिवाय आणखीही राजकीय घटनांनी सरतं वर्ष भरलेलं होतं. त्याची माहितीही तुम्हाला देणार आहोत. मनोरंजन विश्वात 2024 मध्ये काय घडलं? कुठला सिनेमा सर्वाधिक चालला? कुठल्या अभिनेत्याचा बोलबाला होता? कुठला सिनेमा फ्लॉप झाला? ओटीटीच्या जगतात, टीव्ही-सीरिअलच्या जगतात आणि मराठी सिनेसृष्टीत काय घडलं याची बित्तंबामतीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहोत. 2024 हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचं ठरलं. क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातम्याही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच सरत्या वर्षात कोणते फोन लॉन्च झाले, कोणत्या नव्या गाड्या बाजारात आल्या या सर्वांचा वर्षभराचा लेखाजोखाच तुम्हाला पुन्हा वाचायला मिळणार आहे.
तिरंगा फडकला… खेळ सोडला… 2024मधील क्रीडा क्षेत्रातील अभिमानाचे ‘ते’ क्षण
2024 हे वर्ष भारतासाठी क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि दुःखाचे मिश्रण असलेले ठरले. टी-20 विश्वचषकाचा विजय, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील पदके आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ऐतिहासिक यश हे वर्ष उज्ज्वल करणारे घटक होते. दुसरीकडे, अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली, ज्यामुळे भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Dec 31, 2024
- 9:58 pm
नववर्षाच्या शुभेच्छा कशा द्याव्या? भेटवस्तू कोणत्या द्याव्या? जाणून घ्या
नववर्ष येत असून आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. अवघ्या काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने आपल्या खास लोकांना शुभेच्छा दिल्या जातात. पण जर तुम्हाला तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि प्रियजनांना खास वाटावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना खास गिफ्ट देऊ शकता. जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Dec 31, 2024
- 6:23 pm
2024 निरोप अन् 2025 चे स्वागत…जगभरात कुठे सर्वात आधी अन् कुठे सर्वात शेवटी?
2025 happy new year: संपूर्ण जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व पर्यटन स्थळे पर्यटाकांनी फुलली आहे. जगभरात वेगवेगळ्या टाईम झोननुसार वेगवेगळ्या वेळेत नवीन वर्षाचे स्वागत होते. जगभरातील 41 देश असे आहेत ज्या ठिकाणी भारताच्या आधी नवीन वर्षांचे स्वागत केले जाते.
- Jitendra Zavar
- Updated on: Dec 31, 2024
- 3:32 pm
2024 सोन्यासाठी ठरले सोनेरी, सोने दरातील उच्चांक अन् नीच्चांक असा राहिला
Gold Rate in 2024 Maximum: हमास - इजराइल युद्ध, रशिया युक्रेन युद्ध यामुळे यंदा सोने अधिक चमकले. जगातील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बँकांच्या व्याजदरातील चढ-उतार या सर्वांचा परिणाम सोने, चांदीच्या दरावर झाल्याचे सुवर्णव्यवसायिकांनी सांगितले.
- Jitendra Zavar
- Updated on: Dec 31, 2024
- 1:55 pm
नवीन वर्ष 2025 साठी तुमच्या लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्रींचे संकल्प काय?
नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो. मग तो एक सर्वसाधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी असो. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊयात त्याविषयी..
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 31, 2024
- 12:27 pm
‘अजूनही काही गोष्टी समजायच्या बाकी..’; 2024 हे वर्ष संपताना मलायकाच्या पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेत्री मलायका अरोराने वर्षाच्या अखेरीस एक पोस्ट लिहित नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. 2024 हे वर्ष खूप कठीण आणि आव्हानात्मक असल्याचं तिने यात म्हटलंय. याच वर्षी मलायकाने तिच्या वडिलांना गमावलंय. तर अर्जुन कपूरसोबतही तिचं ब्रेकअप झालंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 31, 2024
- 9:03 am
Year Ender : 2024मधील 10 घटना, ज्याने जग…; A पासून Z पर्यंत काय काय घडलं?
2024 हे वर्ष अनेक महत्त्वाच्या घटनांनी भरलेले होते. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेचे राष्ट्रपतीपदी पुनरागमन, भारतातील लोकसभा निवडणुकीतील भाजपचा अपयश, तिरुपती लाडू वाद, आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरण, बांगलादेशातील आंदोलन आणि सीरियातील सत्तांतर यासारख्या घटनांनी हे वर्ष ऐतिहासिक बनले.
- भीमराव गवळी
- Updated on: Dec 30, 2024
- 11:29 pm
नवीन वर्ष साजरे करु नका… मौलाना शहाबुद्दीन रझवी यांचा फतवा
maulana shahabuddin razvi fatwa: रिझवी यांचा फतवा म्हणजे फतव्याचा कारखाना आहे. मुस्लिमांनी हे करू नये, त्यांनी असे करू नये, हे हराम आहे, ते हराम आहे, जे खरोखरच हराम आहे त्याला ते हराम म्हणणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Dec 29, 2024
- 6:22 pm
घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकतात या वस्तू, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच टाका घराबाहेर
आपले घर हे कुटुंबाच्या आनंदाचे समृद्धीचे आणि कल्याणाचे स्त्रोत आहे. अनेक लोक वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराचे बांधकाम करतात आणि त्यानुसार ते घरातील वस्तू देखील ठेवतात. पण घरात नुसत्या वस्तू ठेवून उपयोग नसतो तर घरात कोणत्या गोष्टी शुभ किंवा अशुभ आहेत याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी जाणून घ्या. ज्यामुळे नवीन वर्षात तुमच्या घरात सुख समृद्धी येईल.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Dec 26, 2024
- 8:10 pm
प्रत्येक दिवस सुंदर अन् रात्र उज्ज्वल… खास व्यक्तींना द्या नवीन वर्षाच्या भन्नाट शुभेच्छा
कुटुंब, मित्र, प्रियजनांना पाठवण्यासाठी विविध प्रकारचे शुभेच्छा संदेश तुम्ही देऊ शकता. नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद आणि आशावादी संदेश यावर भर आहे. लेखात दिलेले संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
- निर्मिती तुषार रसाळ
- Updated on: Dec 25, 2024
- 9:45 pm
नव्या वर्षाचे जोरदार स्वागत, अबब…या हॉटेलात एका रात्रीचे भाडे १५ लाख रुपये…
नववर्षाच्या स्वागतासाठी अख्खे जग तयारी करीत असतात. पंचतारांकित हॉटेलाचे एका रात्रीचे भाडे हे पंधरा लाखापर्यंत गेले आहे. चला तर पाहूयात इतके भाडे का आहे ते...
- Atul Kamble
- Updated on: Dec 24, 2024
- 9:19 pm
Year Ender 2024 : सेलिब्रिटिजना भारतातील ही शहरे प्रचंड आवडली, तुम्हाला?; कोणती आहेत शहरं?
2024 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी भारतातील काही शहरांना भेट दिली. जयपूर, उदयपूर, जम्मू-काश्मीर, गोवा आणि कूर्ग ही ठिकाणे सेलिब्रिटींची आवडती ठिकाणे ठरली आहेत. या शहरांची वैशिष्ट्ये आणि सेलिब्रिटींनी त्यांचा अनुभव कसा सांगितला आहे याची माहिती या लेखात आहे. तुमच्या 2025 च्या सुट्टीसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.
- निर्मिती तुषार रसाळ
- Updated on: Dec 24, 2024
- 3:50 pm
केसांशी संबंधित ‘हे’ गैरसमज साल २०२४ मध्येच दूर करा
Hair Related Myths: नववर्ष येण्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला केसांविषयीचे काही गैरसमज सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक मुलीला लांब, दाट आणि चमकदार केस हवे असतात आणि मुले देखील आपल्या लोकांची खूप काळजी घेतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की, केसांशी संबंधित काही मिथक किंवा गैरसमज आहेत, ज्यावर बहुतेक लोक विश्वास ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Dec 23, 2024
- 3:24 pm
2024 मध्ये जगातील टॉप 5 ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स, भारतातील या ठिकाणाचाही समावेश
२०२४ हे वर्ष संपणार आहे. अशा तऱ्हेने लोकांनी आधीच सुट्ट्यांचे प्लॅनिंगही सुरू केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकांना कोणती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आवडली?
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 19, 2024
- 2:46 pm
Year Ender 2024 : अमिताभ बच्चन, अभिषेक, दीपिका पडूकोण ते तृप्ती डिमरी.. या सेलिब्रिटींनी खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, सगळ्यात जास्त पैसे कोणी मोजले ?
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी यावर्षी करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यापासून ते तृप्ती डिमरीपर्यंत अनेक नावांच्या त्यात समावेश आहे. कोणी, कुठे, किती पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले; टाकूया एक नजर..
- manasi mande
- Updated on: Dec 19, 2024
- 8:20 am