Video | विचित्र आजार, अचानक 95 शाळकरी मुली लंगडू लागल्या, कमरेखालचा भाग पॅरालाईज
केनियातील एका गर्ल्स हायस्कूलच्या 100 मुलींना अचानक रहस्यमय आजाराला सामोरे जावे लागले आहे. या मुलींचा कमरेखालचा भाग लुळा पडल्याने त्यांना धड चालताही येत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
केनिया | 6 ऑक्टोबर 2023 : देश-विदेशातील चित्रविचित्र घडामोडी घडत असतात, त्याची उत्तरे विज्ञानालाही समजलेली नाहीत. अचानक एखाद्या समुदायाला विचित्र आजाराने घेरले जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या स्थितीला महासाथ म्हटले जात असले तरी हा आजार विशिष्ट शाळेपुरता मर्यादित असल्याने डॉक्टरांना कोडे पडले आहे. अशा असामान्य स्थितीमुळे जगात या घटनेची चर्चा होत आहे. हा विचित्र प्रकार केनियाच्या एका शाळेत घडला आहे. येथील काकामेगा काऊंटी हायस्कूलमध्ये सुमारे 95 विद्यार्थींनीना विचित्र आजाराला सामोरे जावे लागले आहे. या आजाराची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
शरीराचा खालचा भाग पॅरालाईज
सेंट थेरेसा एरगी हायस्कूलच्या या मुलीबाबत हा दुर्देवी प्रकार घडला आहे. या मुली गेल्या काही आठवड्यापासून रुग्णालयात भरती आहेत. या शाळेतील 95 मुलींचा कमरेखालील भाग अचानक लुळा पडला आहे. एक नव्हे तर 95 शाळकरी मुलींना एकाच वेळी हा आजार झाल्याने डॉक्टरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. या मुलींनी थड चालताही येत नसल्याने त्यांचे पालक हवालदील झाले आहेत. डॉक्टरांनी या प्रकरणाची तपासणी करीत आहेत.
हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल
या कथित साथीमुळे मुलींचे पालक घाबरले आहेत. स्थानिक मिडीयात यासंदर्भात बातम्या येत आहेत. अचानक यामुलींचे पाय सुन्न झाले आहेत. केनियाच्या सोशल मिडीयात या संदर्भातील एक क्लीप व्हायरल होत असून यात मुली लंगडत..लंगडत चालत आहेत. त्यामुळे या आजाराबाबत भीती निर्माण झाली आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
VIDEO: A significant number of students from St. Theresa’s Eregi Girls High School in Kenya have been admitted to the hospital due to an unexplained ailment. The majority of these girls are reportedly experiencing paralysis in their legs, leaving them incapable of walking. #kenya pic.twitter.com/1sPuMbIzPH
— Prince Carlton 🇺🇸 (@_PrinceCarlton_) October 5, 2023
रक्त आणि युरीनचे नमूने घेतले
काकामेगा काऊंटीच्या आरोग्य विभागाचे बर्नार्ड वेसोग्ना यांनी पत्रकारांना सांगितले की या अज्ञात आजाराचे कारण समजून येण्यासाठी या मुलीच्या रक्ताचे आणि युरीनचे नमूने घेतले आहेत. त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यांना टेस्टींगसाठी पाठविली जात आहे. या आजारामागचे नेमके कारण अजून समजून आलेले नाही. घटनेनंतर ही शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.