अंतराळातून 82 तासात आले 1863 रेडिओ सिग्नल; एलियनच्या अस्तित्वाचे रहस्य वाढले

शास्त्रज्ञांना अवकाशाच्या एका कोपऱ्यातून सतत पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत असतात. याची नोंद ठेवली जाते. मात्र, आता शास्त्रज्ञांना नवीन प्रकारचे रेडिओ सिग्नल मिळत आहेत.

अंतराळातून 82 तासात आले 1863 रेडिओ सिग्नल; एलियनच्या अस्तित्वाचे रहस्य वाढले
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 9:13 PM

नवी दिल्ली : खरचं एलियन( aliens ) आहेत का? या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्याप सापडलेले नाही. मात्र, लवकरच या प्रश्नाचे उत्तर सापडणार आहेत. कारण थेट अंतराळातून अशा प्रकारचे संकेत मिळाले आहेत. अंतराळातून 82 तासात आले 1863 रेडियो सिग्नल आले आहेत. यामुळे एलियनच्या अस्तित्वाचे रहस्य वाढले आहे.

शास्त्रज्ञांना अवकाशाच्या एका कोपऱ्यातून सतत पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत असतात. याची नोंद ठेवली जाते. मात्र, आता शास्त्रज्ञांना नवीन प्रकारचे रेडिओ सिग्नल मिळत आहेत.

हे सिग्नल नियमित सिग्नलपेक्षा अधिक स्पीडने येत आहेत. शास्त्रज्ञांना रेडिओ दुर्बिणीतून एकाच दिशेने 91 तास सिग्नल्स येत होते. यापैकी 82 तासांत 1863 सिग्नल प्राप्त झाले आहेत.

पृथ्वीपासून दूर असलेल्या आकाशगंगेतून ये सिग्नल येत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जेथून सिग्नल येत आहेत त्या ठिकाणाला FRB 20201124A असे नाव देण्यात आले आहे.

चीनच्या फाइव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने (फास्ट) हे सिग्नल कॅप्चर केले आहेत. चीनमधील पेकिंग विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या सिग्नल्सचा अभ्यास करत आहेत.

आकाशगंगेत एक चुंबक किंवा न्यूट्रॉन तारा आहे जो हा रेडिओ सिग्नल पाठवत असा दावा हेंग यांनी केलाय. लास वेगासमधील नेवाडा विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ बिंग झांग यांनीही या सिग्नल बाबात माहिती दिली आहे.

आता अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ एकत्रित या सिग्नलचा अभ्यास करत आहेत. ज्या FRB 20201124A मधील आकाशगंगेतून हे सिग्नल आहेत ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेशी मिळती जुळती आहे.

यामुळे या सिग्नलचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जात आहे. मात्र, या सिग्नलचा अद्याप उलगडा झालेला नाही. यातील संकेत अद्याप समजू शकलेले नाहीत. याचा सिग्नलचा अर्थ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.