viral | स्वर्गासारख्या ठिकाणी जॉब, 2 लाख पगार आणि रहाण्यासाठी घर, तरीही मिळेनात लोक
जगात वाढती महागाई आणि लोकसंख्येमुळे बेरोजगारीचे मोठे प्रमाण वाढले आहे. नोकरीसाठी लोक इथे तिथे भटकत आहे. परंतू जगात काही अशीही ठिकाणे आहेत, तेथे नोकरीसाठी माणसेच मिळत नाहीत...
मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : जगातील अनेक देशात बेरोजगारीचे प्रमाण इतके वाढले आहे. चांगले शिकलेले लोकही कमी प्रतीचे कामही करायला अगदी शिपाई बनायलाही तयार होत आहेत. एक जागेसाठी लाखो लोक अर्ज करीत आहेत. जॉबसाठी लोक पार आफिक्रेपासून ते सौदी अरबमध्ये सहज जायला तयार होत आहेत. परंतू एका स्वर्गासारख्या सुंदर ठिकाणी मोठा पगार आणि काम कमी तरीही लोक यायला तयार नाहीत असे असेल तर काय म्हणावं या प्रकाराला…
आम्ही जी जागा तुम्हाला सांगणार आहोत ती रहाण्यासाठी अगदी उत्तम असून निर्सग सौदर्याने नटलेली आहे. या आल्हाददायक वातावरणात राहण्यासाठी नोकरी सोबत घरही मिळत आहे. शहरातील गर्दी आणि प्रदुषणापासून सुटका देणारी या नोकरीला पगारही तगडा आहे. शिवाय कोणत्या खास डीग्री किंवा कौशल्याचीही गरज नाही.
एका बातमीनूसार ही नोकरी युनायटेड किंगडम ( युके ) येथील एका बेटावर निघाली आहे. या बेटाची लोकसंख्या खूपच कमी आहे. स्कॉटलॅंडच्या शेटलॅंड मेनलॅंडपासून 24 मैलावर Fair Lsle नावाचे बेट आहे. येथे केवळ 60 लोक रहातात. तेथे शेती आणि मासेमारीचा व्यवसाय ते करतात.
इतका मिळणार पगार
14 व्या शतकात हे बेट नॉर्वेच्या ताब्यात होते. आता स्कॉटलॅंडचा भाग आहे. या बेटावर MV Good Shepherd नावाने एक फेरी बोटीवर डेकहॅंड पदासाठी नोकरी आहे. ही नोकरी स्वीकारताच तुमचं लाईफ बनून जाईल इतक्या सुविधांची खिरापत आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला आठवड्यात केवळ 31.5 तास काम करावे लागेल. वर्षभरात तुम्हाला 24,539 युरो म्हणजे भारतीय चलनात 24,87,230 रुपयांचा पगार मिळेल. यात स्कॉटीश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या 1,29,697 रु. डिस्टन्स आयलॅंड अलाऊन्सचा देखील समावेश आहे, कर्मचाऱ्याला रहायला सुंदर घर देखील मिळेल.