48 वर्षांची टीचर आणि 22 वर्षांच्या विद्यार्थ्याची अनोखी प्रेमकहाणी… आधी दिला नकार, मग होकार, कसं झालं लग्न ?

मलेशियामध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे एका 22 वर्षांच्या मुलाने 48 वर्षीय महिलेशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे दोघेही शिक्षक आणि विद्यार्थी होते. ही महिला तिच्या पतीची माजी शिक्षिका आहे.

48 वर्षांची टीचर आणि 22 वर्षांच्या विद्यार्थ्याची अनोखी प्रेमकहाणी... आधी दिला नकार, मग होकार, कसं झालं लग्न ?
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 11:53 AM

Teacher Student Marriage : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, परंतु प्रत्येकाला ही भावना मिळत नाही. काही भाग्यवान लोकांनाच त्यांचे प्रेम मिळते. तुम्ही अनेक प्रेमकथा ऐकल्या आणि पाहिल्या असतील, पण आजकाल अशी एक प्रेमकथा चर्चेत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे ज्ञान आणि शिक्षणाचे नाते आहे असे म्हणतात, पण काही लोकांनी या नात्यालाही कलंक लावला आहे. आत्तापर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रेमाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पण सध्या चर्चेत असलेला मुद्दा मलेशियाचा आहे.

खरंतर, एक 22 वर्षांचा मुलगा एका 48 वर्षांच्या महिला शिक्षिकेच्या प्रेमात पडला आणि हे प्रेम इतकं घट्ट की दोघांनीही त्यांच्या वयाकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी लग्नही केलं. जमिलाह मोहम्मद असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे, तर मुलाचे नाव मुहम्मद दानियाल अहमद अली आहे.

ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ही 2016 सालची गोष्ट आहे. तेव्हा मुहम्मद ज्युनियर हायस्कूलमध्ये होता आणि जमीला त्याची शिक्षिका होती. त्यावेळी दोघांच्याही मनात प्रेम किंवा लग्न असा कोणताही विचार नव्हता, कारण दोघेही एकमेकांना फारसे ओळखत नव्हते.

मेसेजवरून बोलता-बोलता प्रेमात पडले

रिपोर्ट्सनुसार, पुढच्या वर्गात गेल्यानंतर मुहम्मद आणि जमीला यांचा एकमेकांशी संपर्क तुटला, पण नंतर असे काही घडले की ते पुन्हा एकदा संपर्कात आले. यानंतर मुहम्मद जमीलाकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागला. मग काही दिवसात जमीलाचा वाढदिवस आला म्हणून त्याने तिला मेसेज करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांचे एकमेकांशी नियमितपणे बोलणे सुरू झाले. दरम्यान, बोलत असताना एके दिवशी मुहम्मदने आपल्या गुरूकडे आपले प्रेम व्यक्त केले. मात्र जमिलाने त्याचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की मुहम्मद त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे.

असे झाले शिक्षिका-विद्यार्थ्याचे लग्न

मात्र, तरीही मुहम्मदने हार मानली नाही आणि एक दिवस थेट जमीलाच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जमिलाला आपले प्रेम अशा प्रकारे समजावून सांगितले की ती त्याच्यासोबत रिलेशनशिप ठेवण्यास तयार झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या घरातील सदस्यांशी बोलून लग्न केले. त्यांच्या लग्नात कुटुंबीयांसह मित्रांनीही हजेरी लावली होती. मलेशियाच्या या अनोख्या लग्नाची खूप चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.