आश्चर्यच! सोन्याच्या कुल्फीची देशात पहिल्यांदाच विक्री, चव भन्नाट अन् किंमत….? पहा Video
सध्या कडाक्याचं ऊन सुरू आहे. त्यामुळे जीवाची काहिली होत आहे. अशावेळी अनेकजण शीतपेय घेताना दिसत आहेत. काही लोक तर कुल्फीचाही अस्वाद घेत आहेत. अशावेळी तुम्हाला सोन्याची कुल्फी खायला मिळाली तर?...
इंदौर : इंदौरमध्ये एका फेरिवाल्याने ‘गोल्ड कुल्फी’विकण्यास सुरुवात केली आहे. चक्क सोन्याची कुल्फी विकत (Gold kulfi) असल्याने त्यावर नेटिजन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही लोक ही आगळीवेगळी कुल्फी खाण्यास उत्सुक आहेत. तर काहींनी हा केवळ पैशाचा अपव्यय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या ‘गोल्ड कुल्फी’वरून सोशल मीडियात जोरदार (social media) चर्चा सुरू आहे. त्यावरून नेटकऱ्यांमध्ये दोन गटही पडले आहेत. काही समर्थन करत आहेत. तर काही लोक विरोध करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा फंडा असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर एवढी महागडी कुल्फी खाण्याची गरजच काय? असा बिनतोड सवाल काही यूजर्स करताना दिसत आहेत.
मँगो, पिस्ता आणि सिंपल अशा विविध प्रकारच्या टेस्टमध्ये ही कुल्फी मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ‘क्लासिक डेझर्ट : सोन्याच्या कुल्फी’चं वेगळंच रुप दाखवण्यात आलं होतं. एका फूड ब्लॉगरने या कुल्फीवाल्याला गाठलं. त्याला काही प्रश्न केले. तू एढी महागडी कुल्फी का विकत आहे? हा पिस्ता एवढा महागडा का आहे? असा सवाल त्याला केला. त्यावर ही कुल्फी सोन्याच्या वर्खाने अच्छादलेली आहे. त्यामुळे ही कुल्फी महागडी आहे, असं या कुल्फी विक्रेत्याने सांगितलं.
अंगावरचे सोन्याचे दागिने पाहून…
विशेष म्हणजे या कुल्फी विक्रेत्याने त्याच्या गळ्यात सोन्याचा भला मोठा हार घातला आहे. त्याच्या गळ्यात सोन्याच्या अनेक चैनी आहेत. हातात सोन्याच्या अनेक अंगठ्या आहेत. तसेच हातातील सोन्याचं कडंही प्रचंड मोठं असून ते पाहिल्यावर डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही. सोन्याचे दागिने घातलेला हा कुल्फीवाला आणि त्याची सोन्याची कुल्फी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
काय आहे किंमत?
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दणादण पोस्ट टाकल्या आहेत. जो तुम्हाला सोन्याची कुल्फी देत आहे, त्याला हा व्हिडीओ टॅग करून शेअर करा, असं कैलाश सोनी या नेटकऱ्याने म्हटलं आहे. पत्ता- प्रकाश कुल्फी, लोकेशन- सराफा बाजार, इंदौर, मध्यप्रदेश, इंडिया, अशी कॅप्शनही त्याने या व्हिडीओवर दिली आहे. फूड ब्लॉगर कलश सोनी याने या कुल्फी विक्रेत्याचा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत हा कुल्फी विक्रेता सोन्याचे दागिने घातलेला दिसत आहे. तो फ्रिजमधून कुल्फी कााढतो. ही कुल्फी 24 कॅरेट सोन्याच्या वर्कमध्ये अच्छादलेली आहे. कलश सोनी याच्या मते, या कुल्फीची किंमत 351 रुपये आहे.