VIDEO | मुलगा बाईकवरती स्टंट करीत होता, काही सेकंदांनी पाहा काय झालं, लोक म्हणाले, ‘टाटा, बाय-बाय, संपलं…’
एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तीन मुलं एका बाईकवरती निघाले आहेत. नागिनसारखी मुलगा बाईक चालवत आहे, त्याचबरोबर गाडीचं स्पीड सुध्दा अधिक आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे. हा व्हिडीओ एका बाईकचा (Bike Stunt) आहे. सध्या मुली सुध्दा स्कुटीवरती स्टंट करीत असल्याचं पाहायला मिळतं. त्याचे सुध्दा व्हिडीओ अधिक व्हायरल झाले आहेत. मुली आणि मुलं सोशल मीडियावर स्टंट केलेले व्हिडीओ शेअर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांगले व्हिडीओ तयार करण्यासाठी मुलं काहीही करीत आहेत. विशेष म्हणजे असे व्हिडीओ तयार करीत असताना आपला जीव सुध्दा धोक्यात घालत असल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तीन मुलं स्टंट करीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर काय झालं ते तु्म्ही व्हिडीओत पाहा.
व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तीन मुलं एका बाईकवरुन निघाली आहेत. त्याचवेळी तीन मुलं रस्त्यावर स्टंट करीत आहेत. त्याचवेळी त्यांची मागून कोणीतरी शुटिंग करीत आहेत. मुलांचं स्पीड सुध्दा अधिक असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे. मुलं नागीनसारखी गाडी चालवत आहेत. गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळं त्या मुलाचं बॅलन्स कसं बिघडतं हे सुध्दा व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर त्यांची बाईक समोर असलेल्या डिव्हायडरवरती आदळते. त्यामध्ये तिन्ही मुलं खाली पडतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ लोकं सुध्दा अधिक कमेंट करीत आहेत.
और कर लो मस्ती रोड पे?? pic.twitter.com/wEBl6m6O4t
— Neha Agarwal (@NehaAgarwal_97) March 29, 2023
आतापर्यंत हा व्हिडीओ ट्विटरवरती 32 हजार लोकांनी पाहिला आहे. @NehaAgarwal_97 या अकाऊंटवरुन तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये अजून करा मस्ती असं लिहिलं आहे. त्या व्हिडीओला 500 लाईक्स आणि अधिक साऱ्या कमेंट आल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, अरे हे तर टिकटॉकवाले आहेत, ते मुद्दाम पडले असतील. तो व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, डिवायडरला धडकण्यापुर्वी मागच्या दोघांनी पायवरती घेतले आहेत.दुसरा एकजण म्हणजे, यांच्यावर कारवाई व्हायला हवी, या सगळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘स्टंट करणारी मुले हेल्मेटशिवाय जात आहेत, ते स्वत: मरतील, ते इतरांनाही मारतील, असे स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तिसरा म्हणाला – अरे धूम मचा ले… व्हिडीओबद्दल तुला काय म्हणायचे आहे? कमेंट मध्ये सांगा.