एक मोटार 3 छताचे पंखे चालवते, देशी जुगाड पाहून लोक म्हणाले, ‘तो बिहारचा इंजिनियर असेल’
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मोटारवरती तीन पंखे चालवले जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्याला अधिक कमेंट केल्या आहेत.
मुंबई : जगात जुगाड करणाऱ्या लोकांची अजिबात (Wonderful Innovation By Jugaad) कमी नाही असं वाटतंय. लोक आपल्या गरजेनुसार जुगाड करीत आहेत. लोक आपल्याकडे असलेल्या टॅलेंटचा चांगला फायदा करत आहेत. काहीवेळा अशा पद्धतीचे जुगाड पाहून लोकांचा डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून शॉक झाले आहेत. तुम्ही तो व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा शॉक बसेल. एका व्यक्तीने एका मशीनवरती तीन फॅन चालू केले आहेत. हा व्हिडीओ (viral video) पाहून अनेकांनी हा नक्की बिहारचा असेल असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर देशी जुगाड केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे तो व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. लोकं हा व्हिडीओ पाहून विचारात पडले आहेत. कारण एका मशीनवरती तीन फॅन चालू आहेत. हा कारनामा पाहून अनेक आम्ही सुध्दा घरी असा प्रयोग करु असं कमेंटमध्ये सांगितलं आहे. हा जुगाड इतर गोष्टींपेक्षा खरचं वेगळा आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांना पसंत सुध्दा पडला आहे.
पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा बिहारचा इंजिनिअर असेल, जो एका मोटारीपासून तीन पंखे चालवत आहे. या पोस्टला आतापर्यंत ७८ हजार लोकांना लाईक केले आहेत. पोस्टला आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता असल्यामुळे त्यावरती अजून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. एका युझरने लिहीलं आहे की, त्याला या कामासाठी एखादा पुरस्कार मिळायला हवा. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, ‘जुगाड खरच कामाला लागलेला दिसतोय.’