अबब ! घराचं छप्पर तोडून 80 किलो वजनाचा अजगर पडला सोफ्यावर, तुमच्या ही अंगाचा उडेल थरकाप
80 किलोचा अजगर घरात शिरला तर काय होईल? विचार करवत नाहीये ना तर मलेशियातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तीन मीटरपेक्षा जास्त लांबीचा अजगर घराचं छप्पर फाडून थेट सोफ्यावर पडला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल.
घरात साधं झुरळ आणि पाल दिसलं तरी कित्येक महिला आणि मुलीं बघूनच घाबरतात. अश्यातच तुम्ही विचार करा की तुम्ही सोप्यावर बसून आवडीचा सिनेमा किंवा सिरीयल बघत आहात. त्यात अचानक घराचं छप्पर फाडून भला मोठा महाकाय अजगर तुमच्या अंगावर पडला तर…… तुम्ही काय कराल? साहजिकच अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या अंगाचा थरकाप उडेल. घसा कोरडा पडेल. असाच काहीसा प्रकार मलेशियातील कामुंटिंग मधील कंपुंग डू येथे एका कुटुंबासोबत घडला आहे. यात घरातील सर्व सदस्य हॉलमधील सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते आणि अचानक तीन मीटरपेक्षा जास्त लांब आणि सुमारे ८० किलो वजनाचा महाकाय अजगर छत तोडून त्यांच्यावर पडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा अजगर जवळच असलेल्या खजुराच्या झाडाच्या बागेतून आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी ताईपिंग जिल्हा नागरी संरक्षण दलाकडे फोन करून घडलेली घटना सांगितली . दरम्यान ही संपूर्ण थरारक घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली होती. यानंतर रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून अजगराला पकडण्यात यश आले. त्यानंतर या अजगराला राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगराला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला घरातील छताचा एक भाग तोडावा लागला. तसेच नेक्स्टा टीव्हीने एक्स वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेस्क्यू टीम बचाव कार्य करताना दिसत आहे. छताला पडलेले मोठं भोक आणि सोफ्यावर फिरणारा एक महाकाय अजगर पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झाले आहेत.
A 3-meter python broke through a house roof and landed on a couch in Malaysia
The family immediately called rescuers to catch the uninvited guest. The massive reptile is set to be released back into the wild.
According to World of Buzz, the python had entered the house from a… pic.twitter.com/tPqaVnRaP6
— NEXTA (@nexta_tv) November 27, 2024
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सने कमेंट केले आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की, “बचाव कर्तेदेखील त्याला कसे पकडायचे याचा विचार करत असतील. तर आणखी एका युजरने लिहिले की, “मी माझ्या आयुष्यात इतका मोठा आणि लठ्ठ अजगर यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.” तसेच एका युजरने कमेंट केली की, ‘व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा आत्मा थरथरला. अशा ठिकाणी मी कधीच राहणार नाही.